राष्ट्रीय

कथुआत दहशतवादी हल्ला चार जवान शहीद, ६ जखमी

Swapnil S

कथुआ/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या माचेडी या दुर्गम परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून, सहा जवान जखमी झाले आहेत.

कथुआ शहरापासून १५० कि.मी. अंतरावर असलेल्या बदनोता गावातील लोहाई मल्हार येथे लष्कराची काही वाहने नियमित गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी या वाहनांवर हातबॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यातून सावरत सुरक्षा दलांनी या हल्ल्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. तेव्हा दहशतवाद्यांनी नजीकच्या जंगलात आसरा घेत गोळीबार सुरूच ठेवला. यावेळी झालेल्या जोरदार धुमश्चक्रीत लष्कराचे ४

जवान शहीद झाले व अन्य सहा जण जखमी झाले. जखमी झालेल्या सहापैकी दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे.

गेल्या चार दिवसांत कथुआ जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी, १२ व १३ जूनला झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले होते व 'सीआरपीएफ'चा एक जवान शहीद झाला होता. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ही चकमक सुरूच होती. या परिसरात लष्कराच्या मदतीला पोलीस व निमलष्करी दलाची अधिक कुमक पाठविण्यात आली आहे. हल्ला करून जंगलात लपलेल्या अतिरेक्यांची संख्या तीन असावी, असा अंदाज असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था