@Tesla_Optimus/X
राष्ट्रीय

भारतात टेस्लाचा ‘ऑप्टिमस’ मानवरूपी रोबोट येणार...रोबोट्समुळे मानवी जीवन अधिक सोपे होईल - इसाबेल फॅन

अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनी योग्य वेळ येताच भारतात मानवरूपी रोबोट ऑप्टिमस आणणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

Krantee V. Kale

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनी योग्य वेळ येताच भारतात मानवरूपी रोबोट ऑप्टिमस आणणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

टेस्ला ही केवळ वाहन कंपनी नसून एक ऊर्जा समाधान देणारी कंपनीदेखील आहे. टेस्लाच्या एपीएसी विभागाच्या प्रमुख इसाबेल फॅन यांनी मुंबईत सांगितले की, कंपनी भारतात ऊर्जा समाधान व्यवसायही योग्य वेळी सुरू करण्याचा विचार करत आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही इतर देशांप्रमाणेच भारतातही आमची उत्पादने आणू इच्छितो. हाच आमचा उद्देश आहे, असे इसाबेल फॅन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रोबोट्समुळे मानवी जीवन अधिक सोपे होईल आणि वेळेचा अधिक चांगला उपयोग करता येईल, असेही सांगण्यात आले. जागतिक स्तरावर हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. मात्र भारतात याबद्दल फार चर्चा होत नाही, असे इसाबेल फॅन यांनी सांगितले.

भारतात व्यवसाय संधी

भारतात पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असून ऊर्जा गरज वाढत असल्याने सौर व ऊर्जा साठवण उपायांची मागणी वाढणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. टेस्ला भारतात केवळ इलेक्ट्रिक वाहनांपुरती मर्यादित न राहता रोबोटिक्स आणि ऊर्जा क्षेत्रातही मोठी संधी पाहत आहे. कंपनी भारतात ऑप्टिमस रोबोट आणि ऊर्जा उपाय आणण्याच्या तयारीत आहे.

टेस्लाचे भारतात दुसरे मॉडेल दाखल

अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने बुधवारी भारतात आपल्या प्रवासाला गती देण्याची घोषणा केली. त्यांनी तीन-रांगांची, सहा-आसनी एसयूव्ही माॅडेल वायएल भारतात दाखल केली असून तिची किंमत ६१.९९ लाख रुपये आहे. हे या देशातील टेस्लाचे दुसरे उत्पादन आहे. गेल्या वर्षी माॅडेल वायच्या लाँचिंगसह भारतात बहुप्रतिक्षित प्रवेश करणाऱ्या या कंपनीने प्रमुख शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवर आपले चार्जिंग नेटवर्क विस्तारण्याच्या कामालाही वेग दिला आहे. टेस्लाचे हे नवीन उत्पादन मर्सिडीज-बेंझच्या एसयूव्ही ईक्युएस आणि ईक्युबी मॉडेल्सशी तसेच एमजी९शी स्पर्धा करेल. या प्रतिस्पर्धी गाड्यांची किंमत ७० लाख ते १.४ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गाडी ० ते १०० किमी प्रति तास वेग गाठण्यासाठी ५.० सेकंद घेते आणि डब्ल्युएलटीपी-प्रमाणित ६८१ किमीपर्यंतची रेंज (एका चार्जमध्ये कापले जाणारे अंतर) देते.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद