Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका 
राष्ट्रीय

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

आगीनंतर पसरलेल्या दाट धुरामुळे दोन रहिवाशांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना...

किशोरी घायवट-उबाळे

नोएडातील फेज-३ परिसरातील एका निवासी इमारतीत ई-बाईकची बॅटरी चार्ज करताना भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीत पसरलेल्या दाट धुरामुळे दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचाव मोहीम राबवत इमारतीतील सुमारे ५० कुटुंबांची सुखरूप सुटका केली.

ई-बाईक बॅटरी चार्जिंग करताना आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मामुरा येथील गल्ली क्रमांक २ मधील जी+४ निवासी इमारतीत घडली. तळमजल्यावर चार्जिंगला लावलेल्या ईव्ही बॅटरीला आग लागल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांनीही पेट घेतला. त्यामुळे काही क्षणांतच आग इमारतीच्या खालच्या भागात पसरली आणि परिसर धुराने भरून गेला.

५० कुटुंबांची सुखरूप सुटका

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेत इमारतीत अडकलेल्या सुमारे ५० कुटुंबांची सुरक्षित सुटका करण्यात आली.

धुरामुळे दोघांचा मृत्यू

आगीनंतर पसरलेल्या दाट धुरामुळे दोन रहिवाशांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतांमध्ये एका पुरुषाचा आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मालकाविरुद्ध गुन्हा, तपास सुरू

या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. इमारतीत अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, तसेच पार्किंगमध्ये ईव्ही बॅटरी चार्ज करणे सुरक्षा नियमांचे उल्लंघन होते का, याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक आणि अग्निशमन विभागाच्या अहवालानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन

तब्बल १८ अब्ज डॉलर्सचा समझोता

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावं का? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य, १० सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर