शक्ती दुबे, हर्षिता गोयल, अर्चित डोंगरे (डावीकडून) 
राष्ट्रीय

‘यूपीएससी’त शक्ती दुबे प्रथम; पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे ही देशातून पहिली आली आहे, तर हर्षिता गोयल दुसरी आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे ही देशातून पहिली आली आहे, तर हर्षिता गोयल दुसरी आली आहे. दरम्यान, पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा, तर महाराष्ट्रातून पहिला आला आहे.

‘यूपीएससी’ परीक्षा सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर व्यक्तिमत्त्व चाचणी (पर्सनॅलिटी टेस्ट) जानेवारी महिन्यात झाली होती. यानंतर त्यातील २४१ उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. एकूण १००९ उमेदवारांची निवड झाली होती. त्यातून आता २४१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या शक्ती दुबे हिने पहिली श्रेणी, हर्षिता गोयलने दुसरी श्रेणी, तर अर्चितने तिसरी श्रेणी मिळवली आहे. यानंतर शाह मार्गी चिराग चौथी, आकाश गर्ग याने पाचवी, कोमल पुनियाने सहावी, आयुषी बन्सलने सातवी, राज कृष्णा झा याने आठवी, तर आदित्य विक्रम अग्रवाल याने नववी श्रेणी मिळविली. मयंक त्रिपाठी हे यूपीएससी परीक्षेत देशातून दहावे आले आहेत.

वर्गवारी

‘यूपीएससी’ने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ७२५ पुरुष उमेदवार आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. १००९ उमेदवारांपैकी ३३५ उमेदवार सर्वसाधारण वर्गवारी, १०९ उमेदवार आर्थिक दुर्बल घटक, ३१८ उमेदवार इतर मागासवर्गीय, १६० अनुसूचित जाती, ८७ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत, तर ४५ उमेदवार दिव्यांग श्रेणीतील आहेत.

विदर्भातील गुणवंत

दरम्यान, ‘यूपीएससी’ परीक्षेत महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे राज्यात पहिला, तर देशात तिसरा आला आहे. तो मूळचा पुण्याचा आहे, तर ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलनेही ३०३ वा क्रमांक मिळवला आहे. विदर्भातील गुणवंत - जयकुमार आडे (३०० रँक), श्रीरंग कावरे (३९६ रँक), राहुल आत्राम (४८१ रँक), सर्वेश बावणे (५०३ रँक), सावी बालकुंडे (५२७ रँक), सौरभ यावले (६६९ रँक), नम्रता ठाकरे (६७१ रँक), सचिन बिसेन (६८८ रँक), भाग्यश्री नैकाले (७३७ रँक), श्रीतेश पटेल (७४६ रँक), शिवांक तिवारी (७५२ रँक) आणि अपूर्व बालपांडे (६४९ रँक).

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन