अहमदाबाद : व्यवसायासोबत गांधीवादी मूल्ये, परोपकार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारे वाघ बकरी टी ग्रुपचे अध्यक्ष पीयूषभाई देसाई यांचे नुकतेच निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते, अशी माहिती वाघ बकरी टी ग्रुपने दिली.
देसाई हे सहा दशकांहून अधिक काळ चहाच्या व्यापाराशी जोडलेले होते. वाघ बकरी ब्रँड देशभरात विस्तार नेण्यात त्यांचा मोठा हात होता.
चहाच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि गुणवत्ता, प्रामाणिकपणा, दीर्घकालीन संबंध तसेच सामूहिक विकासावर आधारित त्यांची व्यावसायिक कार्यपद्धती यासाठी ते ओळखले जात होते, असे समूहाने म्हटले.