नवी मुंबई

बेलापूरमध्ये २५ हून अधिक वृक्षांवर विषप्रयोगाचा संशय!

सीबीडी बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात २५ हून अधिक पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांना विषारी रसायने टोचून नुकसान पोहोचवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सिडको आणि नवी मुंबई महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Swapnil S

उरण : सीबीडी बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात २५ हून अधिक पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांना विषारी रसायने टोचून नुकसान पोहोचवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सिडको आणि नवी मुंबई महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

प्रभावित वृक्षांमध्ये भोकर, बदाम, पाम, चिंच आणि बोर यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे. वृक्षांच्या खोडांना छिद्रे पाडणे, सालीवर घाव घालणे आणि त्यातून रासायनिक पदार्थ टोचले जात असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, हा परिसर एनआरआय कोस्टल पोलीस ठाण्याच्या मागे आणि महापालिका मुख्यालयाजवळ आहे.

पर्यावरण कार्यकर्ते परमदीप गरेवाल आणि पारसिक ग्रीन्सचे निमंत्रक विष्णू जोशी यांनी पाहणी केली असता, काही वृक्षांच्या खोडांतून रासायनिक द्रव बाहेर येत असल्याचे आणि उग्र वास येत असल्याचे आढळले. नागरिकांनी स्वखर्चाने वृक्षांवर उपचारही केले; मात्र पुन्हा वृक्षांना हानी पोहोचवली जात असल्याचा आरोप आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा