नवी मुंबई

फ्लेमिंगोच्या ड्रोन शूटिंगमुळे पर्यावरणवादी नाराज; ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मात्यांविरुद्ध आवाज

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात पक्ष्यांच्या जवळ धोकादायकपणे फ्लेमिंगोंचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनच्या वापर केल्याने पर्यावरणवादी नाराज झाले आहेत. नवी मुंबईतील फ्लेमिंगो शहरातील टीएस चाणक्य येथे फ्लेमिंगोचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते.

Swapnil S

उरण : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात पक्ष्यांच्या जवळ धोकादायकपणे फ्लेमिंगोंचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोनच्या वापर केल्याने पर्यावरणवादी नाराज झाले आहेत. नवी मुंबईतील फ्लेमिंगो शहरातील टीएस चाणक्य येथे फ्लेमिंगोचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते.

नॅटकनेक्ट फाऊंडेशनने याविषयी मॅन्ग्रोव्ह सेल आणि महाराष्ट्र मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे. फ्लेमिंगोचे दृश्य टाइमलाइनमध्ये पाणथळीवर विसावलेले फ्लेमिंगो वर उडताना स्पष्ट दिसते, हे ड्रोनद्वारे चित्रित केले जाते, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. चित्रपटात फ्लेमिंगोचे सौंदर्य दाखवण्यास आमचा काहीही आक्षेप नाही, परंतु विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांवरून उडणाऱ्या ड्रोनचा वापर नक्कीच आक्षेपार्ह आहे. धारदार ब्लेडसह ड्रोन मोठा आवाज करतात ज्यामुळे विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांना त्रास होतो. फ्लेमिंगो फ्लाइंग मशीनच्या संपर्कात आल्यास ते गंभीर जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो, असे ते म्हणाले.

मॅन्ग्रोव्ह सेलने यापूर्वी नॅटकनेक्ट आणि सहकारी पर्यावरण गटांच्या तक्रारीनंतर टीएस चाणक्य वेटलँडवर ड्रोन शूटच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी हा गंभीर मुद्दा नेटफ्लिक्स आणि चित्रपट निर्माते तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त, एनआरआय पोलीस ठाणे आणि सिडको यांच्याकडे कायदेशीररीत्या मांडण्याची विनंती केली आहे.

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video