नवी मुंबई

Navi Mumbai : दोन दिवस जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी; जाणून घ्या पर्यायी मार्ग

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व वाहतूककोंडी टाळण्यासाठी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई शहरात जड-अवजड मालवाहतूक वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही अधिसूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व वाहतूककोंडी टाळण्यासाठी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई शहरात जड-अवजड मालवाहतूक वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही अधिसूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालयाकडून जारी करण्यात आली आहे.

खारघर येथे “हिंद दी चादर” गुरू तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२८ व ०१ रोजी सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक वाहनांना शहरातील सर्व मार्गांवरून प्रवेश, मार्गक्रमण व वाहन उभे करण्यास पूर्णतः बंदी राहील.ही अधिसूचना जीवनावश्यक सेवा देणारी वाहने, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना लागू राहणार नाही.

वाहतूक नियंत्रणासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून नागरिकांनी व वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई वाहतूक विभागाने केले आहे.

पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बोरघाट हद्दीतून खालापूर टोल नाका/चौक फाटा येथे प्रवेशबंदी असेल. संबंधित वाहनांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किंवा जुना पुणे-मुंबई महामार्ग वापरून बोरघाटमार्गे नवी मुंबईत प्रवेश करू नये. वाहने पूर्वनियोजित ट्रक टर्मिनल किंवा पार्किंग ठिकाणी उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

ठाणे महापालिकेसमोर २९० कोटींचे शिवधनुष्य; कर न भरणाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा

मुरूड आगारात CNG गॅस पंप होणार नाही; सर्वेक्षणानंतर निर्णय; प्रवाशांत नाराजी

Mumbai : अधिकाऱ्यांवर कारवाईची पालिकेत मागणी; नौदल तळाजवळ टोलेजंग इमारतीचा वाद