नवी मुंबई

Navi Mumbai : लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलीस अलर्ट; वाशीसह सर्व स्थानकांवर सरप्राईज चेकिंग

बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची हत्येनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरू केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची हत्येनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱ्या तसेच मद्यसेवन करून वावरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली.

लोकलमध्ये चाकू, सुरा, कात्री किंवा अन्य घातक शस्त्र, तसेच ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ घेऊन कुणी वाव‌रू नये, यासाठी वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके