'एआय'ने बनविलेली प्रतिमा
नवी मुंबई

एकाच दिवशी सात वाहने चोरीला; नवी मुंबईत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून आता एकाच दिवशी वाहन चोरीचे तब्बल सात गुन्हे दाखल झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Krantee V. Kale

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, १३ मे रोजी एकाच दिवशी वाहन चोरीचे तब्बल सात गुन्हे दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पनवेल येथील सागर झा यांची ८० हजार रुपयांची दुचाकी राहत्या घराच्या सोसायटी पार्किंगमधून चोरीला गेली, तर खारघर येथील स्वप्नील कलसमन यांची साडेतीन लाख रुपये किमतीची मारुती इको गाडी चोरीला गेली. याशिवाय सुरेश राजपाल यांची ८० हजार रुपयांची दुचाकी पापडीचा पाडा बस थांबा येथून चोरीला गेली. तसेच नेरूळ येथील रशीद सय्यद यांची ८० हजार रुपये किमतीची ज्युपिटर स्कूटर रुपारेल सर्कल येथून चोरीला गेली.

मुंब्रा येथील फर्डीन मेमन यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी उरण येथील पिरवाडी दर्गा मार्ग येथून चोरीला गेली. तर कोपरखैरणे येथील अमोल दाभाडे यांची ५० हजार रुपयांची रिक्षा स्वामी समर्थ मठ मार्ग येथून चोरीला गेली. तसेच वाशी येथील अंकित गुप्ता यांची ८० हजार रुपयांची दुचाकी सेक्टर १४ मधून चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.

वाहनचोरीच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर आहेच पण शिवाय संतापही व्यक्त होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत