नेरूळ येथील कांदळवनात सुमारे १०० ब्रँडेड दूध आणि दह्याची पाकिटे बेवारस अवस्थेत फेकून दिलेली आढळली आहेत. 
नवी मुंबई

Navi Mumbai: कांदळवनात फेकली ब्रँडेड दूध, दह्याची १०० पाकिटे; FDA च्या कारवाईच्या भीतीने पाकिटे फेकल्याची शक्यता

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत सुरू असलेल्या तीव्र कारवाईच्या पार्श्वभूमीवर, नेरूळ येथील कांदळवनात सुमारे १०० ब्रँडेड दूध आणि दह्याची पाकिटे बेवारस अवस्थेत फेकून दिलेली आढळली आहेत.

अमित श्रीवास्तव

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत सुरू असलेल्या तीव्र कारवाईच्या पार्श्वभूमीवर, नेरूळ येथील कांदळवनात सुमारे १०० ब्रँडेड दूध आणि दह्याची पाकिटे बेवारस अवस्थेत फेकून दिलेली आढळली आहेत. एनव्हायर्नमेंट लाईफ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान हा प्रकार उघडकीला आणला असून एफडीएच्या कडक कारवाईच्या भीतीपोटी ही उत्पादने फेकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अयोग्य किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त करणे आणि त्यांचा नष्ट करण्याची कारवाई विभागाकडून वेगाने सुरू आहे. गेल्या ३२२ आठवड्यांपासून नेरूळमधील कांदळवनांच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या या फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना ही पाकिटे कांदळवन क्षेत्रात सापडली.

नेरूळ येथील कांदळवनात सुमारे १०० ब्रँडेड दूध आणि दह्याची पाकिटे बेवारस अवस्थेत फेकून दिलेली आढळली आहेत.

एनव्हायर्नमेंट लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बारई म्हणाले, अग्रगण्य ब्रँड्सचे दूध आणि दह्याची पाकिटे खाडीत फेकून दिली जाणे आणि त्यामुळे कांदळवन परिसंस्थेचे नुकसान होत असल्याचे पाहणे अत्यंत क्लेशकारक आहे. आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी म्हणाले की, एफडीए नियमबाह्य अन्नाविरुद्ध कडक कारवाई करत आहे, अशा वेळी पॅकेज्ड खाद्यपदार्थांची अशा प्रकारे विल्हेवाट लावली जाणे चिंताजनक आहे.

...तर नेमके कारण पुढे येईल

ही पाकिटे नेमकी कोणी टाकली? ती कालबाह्य, खराब, भेसळयुक्त होती की इतर कोणत्या कारणास्तव फेकून दिली गेली? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या पाकिटांवरील बॅच तपशील, एक्सपायरी तारीख आणि त्यांच्या स्रोताचा शोध घेतल्यास या प्रकरणामागील सत्य समोर येऊ शकते आणि नियमभंगाची कारवाई स्पष्ट होऊ शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Uddhav Thackeray Dussehra Rally : सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Eknath Shinde Dussehra Rally: भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा

राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावे; पंतप्रधान मोदी यांचे आवाहन