नवी मुंबई

वाशीत १८ वर्षीय तरुणाची निघृण हत्या

वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात १८ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुजलकुमार फेकू महातो (१८), असे मृत तरुणाचे नाव आहे.

Swapnil S

नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात १८ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुजलकुमार फेकू महातो (१८), असे मृत तरुणाचे नाव आहे.

सुजलकुमार हा कोपरखैरणे सेक्टर-१९ येथे कुटुंबासह राहत होता. तो चायनीज खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर काम करीत होता. तसेच अधूनमधून वडिलांची ऑटोरिक्षाही चालवत होता. शुक्रवारी रात्री तो वडिलांची ऑटोरिक्षा घेऊन घराबाहेर पडला; मात्र कुठे जात असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले नव्हते.

शनिवारी पहाटे सुमारे चार वाजता मिनी सी-शोअर परिसरात मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या महिलेला फुटपाथवर सुजलकुमार मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, हातांवर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार हत्याराने वार केल्याचे प्राथमिक तपासात आढळले. वाशी पोलिसांसह गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू असून, ऑटोरिक्षेचाही शोध घेतला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन

HDFC बँकेचे सीईओ जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती नाकारली; प्रशासकीय चिंतेचे कारण

गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझर वापराला बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाईंदरमध्ये ४.६४ लाख मतदार यादीतून 'गायब'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नेपाळमध्ये ठाण्याचे १२ यात्रेकरू अडकले; जिल्हा प्रशासनाकडून शोध व समन्वयाचे प्रयत्न सुरू