ब्लॅक सूटमध्ये आलियाचा क्लासी लूक; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा Photos (Photos-Instagram/@priyankarkapadia)
फोटो

ब्लॅक सूटमध्ये आलियाचा क्लासी लूक; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा Photos

प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये आलियाने सादर केलेले वेगवेगळे लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'अल्फा' (Alpha) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, चित्रपटासोबतच तिच्या फॅशन सेन्सचीही जोरदार चर्चा रंगली आहे. प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये आलियाने सादर केलेले वेगवेगळे लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

'अल्फा'च्या प्रमोशनदरम्यान आलिया पूर्णपणे ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने ओव्हरसाइज्ड ब्लॅक ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर्स असा पॉवर-ड्रेसिंग लूक निवडला होता. साधा पण आकर्षक असलेल्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

ब्लेझरखाली तिने ब्लॅक लेस कॅमिसोल परिधान केला होता. त्यामुळे संपूर्ण लूकला एलिगंट आणि मॉडर्न टच मिळाला. या पँटसूटची एकूण किंमत सुमारे ८१ हजार असल्याचे सांगितले जात आहे.

आलियाने या लूकसोबत अतिशय कमी ॲक्सेसरीज वापरल्या. साधे कानातले, काही अंगठ्या आणि ब्लॅक हिल्समुळे तिचा लूक अधिक उठून दिसत होता. नैसर्गिक मेकअप आणि स्ट्रेट केसांमुळे तिचा आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना आवडला.

प्रमोशनमधील इतर लूकही चर्चेत

याआधी आलिया तिची सहकलाकार शर्वरी हिच्यासोबत चित्रपटाच्या नावाचे मॅचिंग टॉप परिधान करताना दिसली होती. तसेच ओव्हरसाइज्ड ब्लेझर, कॅप आणि कॉर्सेट-प्रेरित टॉपमधील तिचे लूकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.

'अल्फा'च्या प्रमोशनदरम्यान आलिया भट्टने केवळ चित्रपटामुळेच नव्हे, तर तिच्या स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण फॅशन निवडींमुळेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिच्या प्रत्येक लूकची सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या कोटामधून घातल्या बेड्या

रत्नागिरीत पोलिसांची 'समुद्रभरारी'! QRT च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण; सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पोलीस दल सज्ज

परिवर्तन झाले असेल, तर देशात उजव्या शक्तींचे सरकार सत्तेत कसे आले? ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सवाल

Pune : निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या १५ फूट खोल खड्डयात पडून ज्येष्ठ नागरिकाचा करुण अंत, घटना CCTV मध्ये कैद

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी, व्हिडिओ लावल्यास १००० रु. दंड; थेट तुरूंगवासही, दक्षिण रेल्वेचा नवा नियम