फोटो सौजन्य - वन्यजीव छायाचित्रकार - सुभाष माने आणि विजय पाटील, कोल्हापूर
फोटो

Great Hornbill : पश्चिम घाटमाथ्याचे वैभव; महाधनेश विषयी 'या' रंजक गोष्टी माहित आहेत? जाणून घ्या, काही ठळक बाबी

Kkhushi Niramish
पश्चिम घाट माथ्याचे वैभव असणारा महाधनेश पक्षी हा धिप्पाड शरीरयष्टी, लांबलचक पिवळी चोच, महाकाय पंख लाल चुटूक डोळे असलेला आणि क्वचितच दिसणारा पक्षी आहे. (फोटो सौजन्य - वन्यजीव छायाचित्रकार - सुभाष माने आणि विजय पाटील)
हा पक्षी नेहमी जोडीने फिरतो. केवळ विनीच्या हंगामात जेव्हा मादी अंडे उबवते तेव्हा तिला अन्न भरवण्यासाठी हा पक्षी जवळच्या परिसरात एकटा फिरतो.
महाधनेश हा पक्षी आपल्या जोडीदारासोबत अखेरपर्यंत अत्यंत प्रामाणिक असतो.
झाडाच्या ढोलीत हा पक्षी चिखलाचे घर तयार करतो. या ढोलीतून मादी धनेश चोच बाहेर काढू शकते. एवढीच जागा असते. यामधून नर धनेश पक्षी तिला अन्न भरवतो.
महाधनेशचे पंख इतके विस्तीर्ण आहेत की हा पक्षी उडताना त्याच्या पंखांचा आवाज दीड किलोमीटरपर्यंत जातो.
महाधनेशचा आवाज कर्कश आहे. तो वाघाच्या डरकाळीपेक्षा मोठा असतो. त्याचा आवाज किमान अडीच किलोमीटरपर्यंत जातो.
छोटी फळे, कीटक, हे याचे मुख्य अन्न आहे. कोल्हापुरातील जंगलात हा पक्षी आढळतो.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video