फोटो सौ : @BDLMuseum
फोटो

मुंबईतील ऐतिहासिक वास्तू बघायची इच्छा आहे? मग १५० वर्ष जुन्या 'या' संग्रहालयाला एकदा भेट द्याच...

Swapnil S
मुंबईतील १५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक आणि कलेचा वारसा जपणारे संग्रहालय म्हणजे राणीच्या बागेतील डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालय..
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय १८५७ मध्ये पहिल्यांदा लोकांसाठी खुले करण्यात आले आणि ते मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे.
१८५१ मध्ये लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये होणाऱ्या पहिल्या 'ग्रेट एक्झिबिशन ऑफ द वर्क्स ऑफ इंडस्ट्री ऑफ ऑल नेशन्स'ची तयारी सुरू असताना १८५० मध्ये मुंबईत संग्रहालय उभारण्याची कल्पना प्रथम मांडण्यात आली.
१ नोव्हेंबर १९७५ रोजी, संग्रहालयाचे नामकरण डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय असे करण्यात आले
डॉ. भाऊ दाजी लाड हे पूर्वीचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जायचे. या संग्रहालयाची इमारत मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे.
डॉ. भाऊ दाजी लाड हे मुंबईचे पहिले भारतीय इतिहासकार, चिकित्सक, शल्यचिकित्सक आणि संग्रहालय समितीचे सचिव होते.
या संग्रहालयाला २००५ मध्ये 'युनेस्को'चा हेरिटेज कन्झर्व्हेशन पुरस्कार मिळाला आहे. हे संग्रहालय मार्च २०२३ मध्ये मुंबई महापालिकेने डागडुजीच्या कारणामुळे पर्यटकांसाठी बंद केले होते.
यावर्षी संग्रहालयाचे डागडुजीचे काम पूर्ण करून ८ जानेवारी २०२५ रोजी हे संग्रहालय पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
या संग्रहालयात भारतीय कला, हस्तकला, सांस्कृतिक कला, आणि विविध प्रकाराच्या कला दर्शन घडवणारे संग्रह आहेत. तसेच ऐतिहासिक शिल्प, काचेचे दागिने, आणि पारंपारिक भारतीय कला यांचाही संग्रह आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश