फोटो

शिफॉन साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य; व्हिंटेज बॉलिवूड ग्लॅमरची चर्चा, पाहा Photos

या लूकमधील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे जान्हवीच्या गळ्याभोवती गुंडाळलेली आणि मागे सहजपणे सोडलेली मॅचिंग ओढणी होती.

किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. राम चरण अभिनीत 'पेड्डी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात जान्हवीने खास मोनोक्रोम पर्पल रंगाची साडी नेसली होती.
या लूकमध्ये व्हिंटेज बॉलिवूड एलिगन्स आणि मॉडर्न फॅशन स्टाईलचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.
सेलिब्रिटी स्टायलिस्ट मेगन कॉन्सेसिओने स्टाईल केलेल्या या लूकसाठी जान्हवीने डिझायनर मनीष मल्होत्राची खास शीअर शिफॉन साडी परिधान केली होती.
या लूकमध्ये वापरण्यात आलेली वन-शोल्डर ड्रेपिंग स्टाईल संपूर्ण आउटफिटला इन्स्पायर्ड टच देत होती. मात्र या लूकमधील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे जान्हवीच्या गळ्याभोवती गुंडाळलेली आणि मागे सहजपणे सोडलेली मॅचिंग ओढणी होती.
साडीमध्ये जुना बॉलिवूड चार्म कायम ठेवत जान्हवीने स्ट्रक्चर्ड बँडो स्टाईल ब्लाऊज परिधान केला होता. या ब्लाऊजमध्ये टेक्स्चर्ड डिटेलिंग करण्यात आली होती.
फिकट जांभळ्या रंगाच्या साडीतील फ्लोईंग डिझाइनमुळे संपूर्ण लूकमध्ये रोमँटिक आणि सॉफ्ट एस्थेटिक दिसून येत होता.
त्याचबरोबर हा लूक सध्या आंतरराष्ट्रीय रेड कार्पेट फॅशनमध्ये लोकप्रिय असलेल्या ट्रेंडशीही जुळणारा होता. जान्हवीने या लूकसोबत 'जेट जेम्स'चे स्टेटमेंट इअररिंग्स आणि रिंग परिधान केली होती. तसेच 'गोलेचाज ज्वेल्स'चे ब्रेसलेटही घातले होते.
कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी जान्हवीच्या या लूकची तुलना श्रीदेवी यांच्या 'काटे नहीं कटते' गाण्यातील प्रसिद्ध निळ्या शिफॉन साडी लूकसोबत केली.अनेक चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले की, जान्हवीने आपल्या आईची ग्रेस, एलिगन्स आणि जुन्या बॉलिवूड ग्लॅमरची आठवण पुन्हा ताजी केली आहे.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय