कांजीवरम साडी, कुंदन दागिने अन् गजरा; कंगना रणौतचा रॉयल लूक चर्चेत (All Photos - Instagram/@kanganaranaut)
फोटो

कांजीवरम साडी, कुंदन दागिने अन् गजरा; कंगना रणौतचा रॉयल लूक चर्चेत

साडीवर फुलांची नक्षी, जांभळ्या रंगाच्या छटा आणि आकर्षक सोनेरी जरीकाम करण्यात आले होते.

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूडमध्ये पारंपरिक भारतीय फॅशन आणि हातमागावरील वस्त्रांना ग्लॅमरस अंदाजात सादर करणाऱ्या अभिनेत्री-खासदार कंगना रणौतचा नवा लूक सध्या चर्चेत आहे.

तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात कंगनाने खास साडी लूकमध्ये उपस्थिती लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा राजेशाही अंदाज पाहून सोशल मीडियावरही तिच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.

कंगनाच्या साडी लूकने वेधले लक्ष

इन्स्टाग्रामवर कंगनाने या लूकची झलक शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. प्रसिद्ध डिझायनर गौरंग शाह यांनी डिझाइन केलेल्या हस्तनिर्मित साडीत कंगनाचा पारंपरिक अंदाज अधिक खुलून दिसत होता.

तिने आयव्हरी रंगाची कांजीवरम रेशमी साडी परिधान केली होती. साडीवर फुलांची नक्षी, जांभळ्या रंगाच्या छटा आणि आकर्षक सोनेरी जरीकाम करण्यात आले होते. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अतिशय एलिगंट आणि रॉयल दिसत होता.

या साडीसोबत कंगनाने जांभळ्या रंगाचा रेशमी ब्लाउज परिधान केला होता. ब्लाउजवरील पारंपरिक नक्षीकाम आणि बाहींवरील जरीकामामुळे तिच्या लूकमध्ये अधिक उठाव दिसून आला.

पारंपरिक दागिन्यांनी वाढवली शोभा

ॲक्सेसरीजसाठी कंगनाने पारंपरिक भारतीय दागिन्यांची निवड केली होती. तिने कुंदन आणि पाचूच्या दगडांनी सजलेला दागिन्यांचा सेट परिधान केला होता. यामध्ये चोकर, कानातले, ब्रेसलेट्स आणि अंगठ्यांचा समावेश होता.

मेकअपसाठी तिने साधा पण आकर्षक लूक ठेवला होता. हलका आय मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि जांभळ्या रंगाची छोटी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत होती.

गजऱ्याने मिळाला पारंपरिक टच

कंगनाच्या या संपूर्ण लूकमध्ये तिच्या हेअरस्टाइलनेही सर्वांचे लक्ष वेधले. तिने कुरळे केस अर्धे बांधून अर्धे मोकळे ठेवले होते.

केसांमध्ये माळलेल्या पांढऱ्या गजऱ्यामुळे तिच्या लूकला खास पारंपरिक आणि विंटेज टच मिळाला.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया