फोटो

मुंबईत पावसाचा कहर! पूरस्थितीत उपयोगी ठरणार 'हे' ६ अ‍ॅप्स, रिअल-टाइम अलर्टपासून लोकल अपडेट्सपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

Mumbai Rains: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती, हवामान, लोकल ट्रेन, वाहतूक आणि रिअल-टाइम अलर्टची माहिती देणारी 'ही' ६ उपयुक्त अ‍ॅप्स जाणून घ्या.

Mayuri Gawade

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, वाहतुकीची कोंडी आणि लोकल रेल्वे सेवेत अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग्य माहिती वेळेवर मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूरस्थिती, हवामान, वाहतूक आणि रेल्वे सेवांबाबत रिअल-टाइम अपडेट्स देणारी काही अधिकृत आणि विश्वासार्ह अ‍ॅप्स नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या अशा सहा महत्त्वाच्या अ‍ॅप्सबद्दल.

१. Disaster Management BMC

बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेले हे अ‍ॅप मुंबईतील पावसाळी आपत्कालीन परिस्थितीसाठी खास तयार करण्यात आले आहे. यात वाहतूक बदल, लोकल रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनोरेल आणि विमानसेवेबाबत अपडेट्स मिळतात. तसेच आयएमडीचे हवामान इशारे, एसओएस सुविधा, जवळील पोलीस ठाणे, रुग्णालय, अग्निशमन केंद्र, पूरग्रस्त भाग आणि तात्पुरत्या निवारा केंद्रांची माहितीही उपलब्ध आहे.

उपलब्ध: अँड्रॉइड आणि आयओएस

२. Sachet

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) विकसित केलेले हे अ‍ॅप पूर, चक्रीवादळ, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत स्थानाधारित (Geo-tagged) इशारे देते. आयएमडीच्या हवामान अंदाजासह आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचना देखील यात उपलब्ध आहेत.

उपलब्ध: अँड्रॉइड आणि आयओएस

३. FloodWatch India

केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) या अ‍ॅपमध्ये देशभरातील पूरस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या शेकडो केंद्रांची माहिती उपलब्ध आहे. उपग्रह माहिती आणि गणितीय मॉडेलच्या आधारे हे अ‍ॅप सात दिवसांपर्यंतचा पूराचा अंदाज, धोक्याचे मूल्यांकन आणि आवश्यक खबरदारीची माहिती देते.

उपलब्ध: अँड्रॉइड आणि आयओएस

४. m-Indicator

मुंबईकरांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेले हे अ‍ॅप लोकल ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक, बेस्ट व इतर बससेवांचे वेळापत्रक आणि प्रवाशांकडून मिळणारे अपडेट्स उपलब्ध करून देते. काही महत्त्वाची माहिती इंटरनेटशिवायही पाहता येते.

उपलब्ध: अँड्रॉइड आणि आयओएस

५. Windy

पाऊस, वाऱ्याचा वेग, ढगांची हालचाल, डॉपलर रडार आणि वादळी हवामानाचा अंदाज दाखवणारे हे लोकप्रिय हवामान अ‍ॅप आहे. पाऊस आपल्या परिसरात कधी पोहोचणार, याचाही अंदाज यातून घेता येतो.

उपलब्ध: अँड्रॉइड आणि आयओएस

६. Mumbai Flood

आयआयटी बॉम्बेच्या हवामान अभ्यास विभागाने विकसित केलेल्या या प्लॅटफॉर्मवर तासागणिक पावसाचा अंदाज, मिठी नदीसह पूरप्रवण भागांतील पाण्याची पातळी आणि नागरिकांकडून नोंदवलेली पूरस्थितीची माहिती उपलब्ध असते. हा प्लॅटफॉर्म mumbaiflood.in या संकेतस्थळावरही वापरता येतो.

उपलब्ध: अँड्रॉइड (वेब पोर्टल सर्व उपकरणांवर उपलब्ध)

ही अ‍ॅप्स वापरल्यास मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांना हवामान, पूरस्थिती आणि वाहतुकीबाबत वेळेवर माहिती मिळून सुरक्षित प्रवास आणि योग्य नियोजन करण्यास मोठी मदत होऊ शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

Mumbai : मानखुर्दमध्ये दुर्घटना; सहा जणांचा मृत्यू