(सर्व छायाचित्र : Yandex)
फोटो

Navratri 2026 : साध्या कुर्त्याला मिळेल पारंपरिक टच; नवरात्रीसाठी ट्राय करा ऑक्सिडाईज्ड इअररिंग्सचे 'हे' प्रकार

Navratri 2026 : साध्या कुर्त्याला मिळेल पारंपरिक टच; नवरात्रीसाठी ट्राय करा ऑक्सिडाईज्ड इअररिंग्सचे 'हे' प्रकार

किशोरी घायवट-उबाळे
मोठे झुमके देतील रॉयल लूक - नवरात्रीत साधा कुर्ता किंवा अनारकली ड्रेस घालणार असाल, तर त्यासोबत मोठे ऑक्सिडाईज्ड झुमके घाला. यामुळे तुमच्या लूकला पारंपरिक आणि आकर्षक टच मिळेल.
चांदबालीने वाढवा सौंदर्य - चंद्राच्या आकारातील चांदबाली सणासुदीच्या लूकसाठी उत्तम पर्याय आहेत. कुर्ती, साडी किंवा घागरा-चोळी अशा प्रत्येक पोशाखासोबत त्या सुंदर दिसतात.
काळ्या फिनिशचे कानातले दिसतील उठून - ऑक्सिडाईज्ड दागिन्यांमधील काळसर फिनिश तुमच्या लूकला वेगळीच ओळख देते. विशेषतः पांढऱ्या, लाल किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यांसोबत हे कानातले छान उठून दिसतात.
घुंगरूंच्या नक्षीतून पारंपरिक अंदाज - कानातल्यांच्या खालच्या बाजूला लटकणारे छोटे घुंगरू प्रत्येक हालचालीसोबत लक्ष वेधून घेतात. गरबा खेळताना किंवा नवरात्रीच्या कार्यक्रमाला जाताना हा पॅटर्न नक्कीच खास दिसेल.
इयरकफ्सने मिळवा हटके स्टाइल - नेहमीचे झुमके किंवा बाली घालण्याऐवजी यंदा ऑक्सिडाईज्ड इयरकफ्स निवडा. इंडो-वेस्टर्न पोशाखासोबत ते घातल्यास पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधता येईल.
रंगीत खड्यांचे कानातले करतील लूक खुलवण्याचे काम - नवरात्रीत रंगीबेरंगी कपडे घालायला आवडत असतील, तर लाल, हिरव्या किंवा निळ्या खड्यांचे ऑक्सिडाईज्ड कानातले निवडा. कपड्यांशी जुळणारे खडे तुमच्या लूकमध्ये रंगांची सुंदर भर घालतील.
हेवी डिझाइनने साध्या कपड्यांनाही मिळेल खास टच - साधी साडी किंवा एकाच रंगाचा कुर्ता घातला असेल, तर मोठ्या आणि नक्षीदार ऑक्सिडाईज्ड कानातल्यांची निवड करा. यामुळे जास्त दागिने न घालताही तुमचा सणासुदीचा लूक आकर्षक दिसू शकतो.
मोत्यांच्या डिझाइनमधून मिळवा एलिगंट लूक - ऑक्सिडाईज्ड कानातल्यांवर पांढऱ्या मोत्यांची सजावट असेल, तर त्यांना एक नाजूक आणि उठावदार लूक मिळतो. पारंपरिक कपड्यांसोबत हा पॅटर्न घातल्यास साधेपणातही सौंदर्य खुलून दिसते.
योग्य कानातल्यांची निवड करताना लक्षात ठेवा ही गोष्ट - कानातले निवडताना तुमच्या कपड्यांचा रंग, गळ्याची डिझाइन आणि कार्यक्रमाचा प्रकार लक्षात घ्या. मोठे कानातले घालत असाल, तर गळ्यातील दागिने हलके ठेवा, जेणेकरून तुमचा संपूर्ण लूक संतुलित आणि आकर्षक दिसेल.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग