छायाचित्र : एएनआय
फोटो

Nirmala Sitharaman : यंदाची 'बजेट डे साडी' आहे खास! काय आहेत वैशिष्ट्य? याआधीही नेसल्या होत्या युनिक साड्या; पाहा Photo's

दरवर्षी जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो, तेव्हा देशाचं लक्ष आर्थिक धोरणं, घोषणा आणि आकडेवारीकडे लागलेलं असतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून बजेटच्या दिवशी आणखी एक गोष्ट आवर्जून चर्चेत येते ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी. दरवर्षी त्यांचा बजेट लूक सामान्य लोकांपासून फॅशनविश्वापर्यंत चर्चेचा विषय ठरतो.

Mayuri Gawade

दरवर्षी जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतो, तेव्हा देशाचं लक्ष आर्थिक धोरणं, घोषणा आणि आकडेवारीकडे लागलेलं असतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून बजेटच्या दिवशी आणखी एक गोष्ट आवर्जून चर्चेत येते ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी. बजेट भाषणाआधीच त्यांच्या पेहरावाची चर्चा सुरू होते. बजेटमध्ये काय जाहीर होणार, यासोबतच यंदा अर्थमंत्री कोणत्या राज्याची पारंपरिक साडी नेसून संसदेत येणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष असतं. निर्मला सीतारामन यांची 'बजेट डे साडी' आता फक्त फॅशनपुरती मर्यादित न राहता, भारतातील विविध हातमाग साड्यांचं दर्शन घडवणारी ओळख बनली आहे. म्हणूनच दरवर्षी त्यांचा बजेट लूक सामान्य लोकांपासून फॅशनविश्वापर्यंत चर्चेचा विषय ठरतो.

बजेट २०२६ : कांजीवरम सिल्क साडी...

बजेट २०२६ च्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तमिळनाडूची पारंपरिक कांजीवरम सिल्क साडी नेसून संसदेत पोहोचल्या. त्यांनी मॅजेंटा आणि जांभळ्या रंगाची हाताने विणलेली कांजीवरम सिल्क साडी नेसली आहे, ज्यावर सोनेरी जरीचे सुंदर काम करण्यात आले असून साडीचा पदर आणि बॉर्डर अत्यंत आकर्षक दिसत आहे. मोठ्या आणि महत्त्वाच्या बजेट प्रसंगासाठी हा पारंपरिक, देखणा लूक अत्यंत लक्षवेधी ठरला.

पाहा, याआधी बजेटच्या दिवशी नेसलेल्या साड्या

२०२५ : आयव्हरी रंगाची साडी, मधुबनी शैलीतील हाताने काढलेली चित्रं आणि नाजूक नक्षी.

२०२४ (अंतरिम बजेट) : निळ्या रंगाची तुसार सिल्क साडी, संपूर्ण साडीवर पारंपरिक कांथा भरतकाम.

२०२४ (पूर्ण बजेट) : मंगलगिरी सिल्क साडी, साधा पोत आणि स्वच्छ रेषांचा पॅटर्न.

२०२३ : इलकल साडी, ठळक पदर, पारंपरिक विणकामाची ओळख.

२०२२ : बोमकाई साडी, रुंद काठ आणि पारंपरिक नक्षीचा डिझाइन.

२०२१ : पोचमपल्ली इकत साडी, भूमितीय आकृत्या आणि उठावदार रंगसंगती.

२०२० : पिवळसर-सोनसळी रंगाची सिल्क साडी, साधा आणि सोज्वळ लूक.

२०१९ : उजळ गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी, पारंपरिक पोत आणि साधं डिझाइन.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल