फोटो

सुप्रिया सुळेंच्या लेकीचं ठरलं लग्न; सोशल मीडियावर Photo व्हायरल, काय करतात होणारे जावई? जाणून घ्या सर्व काही

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, सारंग अरुण लखानी यांच्याशी त्यांचे लग्न होणार आहे. ही माहिती ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर समोर आली.

किशोरी घायवट-उबाळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे उद्योजक सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर ही बातमी समोर आली.

सुळे आणि लखानी कुटुंबातील हे नाते जुळवून आणण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत.

सारंग लखानी हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.सारंग लखानी यांनी २०१४ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.कॉम.,आयआयएम बंगळुरू येथून मॅनेजमेंट स्टडीज आणि मे २०२३ मध्ये कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले आहे.

रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथून पदवी शिक्षण पूर्ण केले असून, सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.) ही पदवी मिळवली आहे.

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे ही दोन मुले आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान रेवती सुळे पहिल्यांदाच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद