फोटो

ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये साराचा बोल्ड अंदाज; अंजली तेंडुलकरांनीही वेधलं लक्ष, पाहा Photos

मुंबई अकॅडमी ऑफ द मूव्हिंग इमेजतर्फे आयोजित या कार्यक्रमात मायलेकींच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

किशोरी घायवट-उबाळे
सारा तेंडुलकर नुकतीच तिची आई अंजली तेंडुलकर यांच्यासोबत मुंबईत आयोजित 'मामी सिलेक्ट २०२६ : फिल्म्ड ऑन आयफोन' कार्यक्रमात सहभागी झाली होती. मुंबई अकॅडमी ऑफ द मूव्हिंग इमेजतर्फे आयोजित या कार्यक्रमात मायलेकींच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दोघींनीही काळ्या रंगाचे ड्रेस परिधान करत आधुनिक ग्लॅमर आणि क्लासिक एलिगन्सचा सुंदर मिलाफ सादर केला.
सारा तेंडुलकरने काळ्या रंगाचा आकर्षक मिनी ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये तिचा लूक अधिक उठून दिसत होता. तिने मिनिमल पण लक्झरी स्टाइलमध्ये लेयर्ड गोल्डन नेकलेस, नाजूक इअररिंग्स आणि स्ट्रॅपी हिल्सची निवड केली होती.
साराने सॉफ्ट-ग्लॅम मेकअप लूक निवडला होता. हलका ब्लश, डोळ्यांवर शिमर आणि ग्लॉसी न्यूड लिप्समुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता.
तिने वेव्ही हेअर सेंटर पार्टिशनसह मोकळे ठेवले होते, ज्यामुळे तिचा संपूर्ण रेड कार्पेट लूक अधिक उठून दिसत होता.
अंजली तेंडुलकर यांनी काळ्या रंगातील एम्ब्रॉयडरी केलेला आकर्षक कफ्तान परिधान केला होता. या पोशाखावर मध्यभागी आणि स्लीव्ह्जवर सोनेरी डिटेलिंग करण्यात आले होते, ज्यामुळे साध्या पोशाखाला रॉयल आणि फेस्टिव्ह टच मिळाला. हा रिलॅक्स्ड पण एलिगंट लूक पारंपरिक भारतीय फॅशन आणि आधुनिक स्टाइलचा सुंदर संगम दर्शवत होता.
अंजली यांनी नाजूक गोल्ड ज्वेलरीसोबत ब्लॅक हँडबॅग कॅरी केली होती. त्यांनी फ्रेश आणि नैसर्गिक मेकअप लूक निवडत हलका काजळ, रोझी चीक आणि म्यूटेड पिंक लिप शेडचा वापर केला होता.
मुंबईतील या स्टार स्टडेड कार्यक्रमात सारा आणि अंजली तेंडुलकर यांच्या स्टायलिश उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. साधेपणा आणि एलिगन्स कधीही आउट ऑफ स्टाइल होत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग