क्रीडा

नाशिकच्या १९ जणांना कझाकस्तानमध्ये मिळाली ‘आयर्नमॅन’ची उपाधी

आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अश्‍विनी देवरे यांचाही समावेश आहे

वृत्तसंस्था

कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत नाशिकच्या १९ जणांनी ‘आयर्नमॅन’ उपाधीचा मान मिळविला. स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सलग तीन वेळा अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी आयर्नमॅन स्पर्धा जिंकत हॅटट्रिक साधली.

आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अश्‍विनी देवरे यांचाही समावेश आहे. त्या आयर्नमॅन उपाधी मिळविणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्याच महिला पोलिस कर्मचारी असण्याची शक्यता आहे. स्वीमिंग, सायकलिंग आणि धावणे, अशी ही खडतर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगभरात अनेक ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आयोजित केली जाते. कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी नाशिकमधील १९ जणांनी सहभाग घेतला होता.

एक दोन नव्हे तर सर्वच स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत एकप्रकारे विक्रमच साधला आहे. यापूर्वी प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले या खेळाडूंनी दोन आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. ३.८ किमी स्वीमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

‘आयर्नमॅन’चे मानकरी

डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झंवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झंवर, नीता नारंग, आविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार.

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी–राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर

Thane : ...तर आम्ही १३१ जागा स्वबळावर लढवण्यास पूर्णपणे तयार; NCP अजित पवार गटाचा इशारा

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात; नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब; अटकेची टांगती तलवार