क्रीडा

मातृत्वानंतर दीपिकाचे पुनरागमनात सुवर्ण यश

जागतिक क्रमवारीत एकेकाळी अग्रस्थानी असलेल्या २९ वर्षीय दीपिकाने १४ महिन्यांनी प्रथमच पुनरागमन केले.

Swapnil S

बघदाद : मातृत्वानंतर पुनरागमन करणाऱ्या दीपिका कुमारीने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामुळे आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या १४ पर्यंत उंचावली. अखेरच्या दिवशी भारताने तीन कांस्यपदकेसुद्धा जिंकली.

जागतिक क्रमवारीत एकेकाळी अग्रस्थानी असलेल्या २९ वर्षीय दीपिकाने १४ महिन्यांनी प्रथमच पुनरागमन केले. तिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. दीपिकाने रिकर्व्ह प्रकारात सिमरनजीत कौरला ६-२ अशी धूळ चारली. २०२२नंतर तिचे हे पहिलेच जेतेपद ठरले. त्यानंतर तिने सांघिक प्रकारात उझेबेकिस्तानवर ५-४ अशी मात केली. त्याशिवाय पुरुषांच्या रिकर्व्ह व मिश्र सांघिक प्रकाराने बांगलादेशवर मात करून सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांनी बांगलादेशचा ६-० असा धुव्वा उडवला, तर मिश्र गटात त्यांनी बांगलादेशला ६-२ असे नमवले.

एकेरीत धीरज बोमदेवराने तरुणदीप रायला ७-३ असे नमवून सुवर्णपदकाचा वेध साधला. प्रथमेश जावकरने कम्पाऊंड प्रकारात कुशल दलालला १४६-१४४ असे पराभूत केले. महिलांमध्ये परणीत कौरने इराणच्या फातिमा हेमतीला १३८-१३५ असे नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने या स्पर्धेत एकूण १४ पदके जिंकली. यामध्ये १० सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्यपदकाचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी