X
क्रीडा

Asian Games 2026 : महिला हॉकी; भारताचा इंडोनेशियावर १७-१ ने दणदणीत विजय

आक्रमक आघाडीची खेळाडू दीपिका सेहरावत, ऋतुजा दादासो पिसाळ आणि नवनीत कौर यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इंडोनेशियाचा १७-१ असा धुव्वा उडवला.

Swapnil S

टोयोटा : आक्रमक आघाडीची खेळाडू दीपिका सेहरावत, ऋतुजा दादासो पिसाळ आणि नवनीत कौर यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत इंडोनेशियाचा १७-१ असा धुव्वा उडवला.

गट ‘ब’मधील या सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १९-० असा पराभव करणाऱ्या भारताकडून २२ वर्षीय दीपिकाने ८व्या, २८ व्या आणि ४० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत हॅटट्रिक साधली. ऋतुजाने १५ व्या, २० व्या आणि ३८ व्या मिनिटाला मैदानी गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली, तर नवनीतने ३५ व्या, ५६ व्या आणि ५७ व्या मिनिटाला गोल लगावले. याशिवाय सुनेलिता टोप्पो (११ वे, ३० वे मिनिट), लालरेमसियामी (१२ वे, १६ वे मिनिट) आणि साक्षी राणा (२५ वे, ५७ वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. कर्णधार सलिमा टेटे (३५ वे मिनिट) आणि इशिका चौधरी (३६ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. इंडोनेशियाकडून एकमेव गोल इनेस आदितियाने ३२ व्या मिनिटाला केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन