क्रीडा

Axar Patel : के. एल. राहुलनंतर भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलचेही झाले लग्न ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख मिळवणाऱ्या अक्षर पटेलने (Axar Patel) आपल्या प्रेयसीसोबत बांधली लग्नगाठ

प्रतिनिधी

नुकतेच भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलचे लग्न झाले. त्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने लग्नगाठ बांधली. तो म्हणजे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल. (Axar Patel) अक्षर पटेलने गुरुवारी वडोदरा येथे प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्न केले.

गेल्यावर्षी २० जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. मेहा पटेल ही व्यवसायाने डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. तसेच, ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अगदी धुमधडाक्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

अक्षर पटेल आणि मेहा पटेलच्या लग्नामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, जयदेव उनाडकटसह अनेक क्रिकेटपटुंनी हजेरी लावली होती. वडोदरामध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला. अक्षरच्या लग्नानंतर त्याच्या संगीत आणि वरातीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल