क्रीडा

विश्वविजेत्या दिव्याला ३ कोटींचे पारितोषिक; राज्य शासनाकडून आज नागपूर येथे होणार गौरव सोहळा

महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखला राज्य शासनाकडून ३ कोटींचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. नागपूर येथे शनिवारी दिव्याचा गौरव सोहळा रंगणार आहे. तसेच दिव्याच्या मार्गदर्शकांना ३० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखला राज्य शासनाकडून ३ कोटींचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. नागपूर येथे शनिवारी दिव्याचा गौरव सोहळा रंगणार आहे. तसेच दिव्याच्या मार्गदर्शकांना ३० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

जॉर्जिया येथे झालेल्या महिलांच्या तिसऱ्या विश्वचषकात दिव्याने अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये भारताच्याच अनुभवी ३८ वर्षीय कोनेरू हम्पीला १.५-०.५ असे पराभूत केले. दिव्या ही ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारी चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. तर एकंदर भारताच्या ८८व्या खेळाडूने हा किताब मिळवला. तसेच दिव्याने सर्वात तरुण विश्वविजेती ठरण्याचाही पराक्रम केला. दिव्याला सोमवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षांद्वारे झळाळता चषक देण्यात आला. तसेच ती ४२ लाखांच्या पारितोषिकाचीही मानकरी ठरली.

१९ वर्षीय दिव्याचा शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनीही दिव्याची भेट घेतली. तसेच तिच्याशी संवाद साधला. “विजेतेपद भारतीय खेळाडूने मिळवावे, हीच माझी इच्छा होती. त्यामुळे मी पराभूत झाले असते, तरी हम्पीच्या रूपात भारताकडेच विजेतेपद आले असते,” असे दिव्या म्हणाली.

“केंद्र शासनाने माझा सत्कार केल्यामुळे मी त्यांची आभारी आहे. माझ्या कारकीर्दीला आता सुरुवात झाली असून यापुढे बराच पल्ला गाठायचा आहे. बुद्धिबळात भारताचे आणखी नाव उज्ज्वल करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन,” असेही दिव्याने सांगितले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये