ऑस्ट्रेलियाची आगेकूच; तुर्कीयेचा शेवट गोड X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाची आगेकूच; तुर्कीयेचा शेवट गोड

ऑस्ट्रेलिया आणि पराग्वे यांच्यातील ड-गटातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने ऑस्ट्रेलियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या निकालामुळे पराग्वेचा संघही पुढील फेरीत जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Swapnil S

सांताक्लारा : ऑस्ट्रेलिया आणि पराग्वे यांच्यातील ड-गटातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने ऑस्ट्रेलियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या निकालामुळे पराग्वेचा संघही पुढील फेरीत जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.

याच गटातील अन्य लढतीत तुर्कीयेने अमेरिकेला ३-२ असे पराभूत केले. मात्र अमेरिकेने अग्रस्थानासह आधीच बाद फेरी गाठली होती. तर तुर्कीयेने विजयासह स्पर्धेचा शेवट गोड केला. अमेरिकेने ६, तर ऑस्ट्रेलियाने ४ गुण मिळवले.

ऑस्ट्रेलिया-पॅराग्वे लढतीत दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्न केल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक टोनी पोपोविक यांनी सांगितले. दोन्ही संघांकडे यापूर्वी प्रत्येकी तीन गुण होते. सामना बरोबरीत सुटल्याने ऑस्ट्रेलियाला गोल फरकामुळे गटात दुसरे स्थान मिळाले, तर चार गुणांसह पराग्वेलाही पुढील फेरीच्या संधीची आशा आहे. ऑस्ट्रेलियन मिडफिल्डर अझदीन ह्रुस्टिकने या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.

सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात गोल करण्याच्या उत्तम संधी होत्या, परंतु पराग्वेचा गोलरक्षक ओरलँडो गिल याने जॅक्सन इर्व्हाइन आणि ख्रिस्टियन व्होल्पॅटो यांचे प्रयत्न हाणून पाडले. दुसऱ्या सत्रात पराग्वेचा ताबा अधिक होता, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक पॅट्रिक बीच यानेही भरपाई वेळेत मॉरिशिओचा प्रयत्न फळाला येऊ दिला नाही. दरम्यान, १८ वर्षांचा ल्युकास हेरिंग्टन हा विश्वचषक खेळणारा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियाचा संघ आता ३ जुलै रोजी बाद फेरीत जी-गटामधील उपविजेत्या संघाशी दोन हात करणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले

वळगणीच्या 'चिवनी' मच्छीला ग्राहकांची पसंती; अवघ्या २० ते २५ दिवसांचीच उपलब्धता; बाजारात मोठी मागणी

मुंबईकरांना मिळणार पुनर्प्रक्रिया केलेले पिण्यायोग्य पाणी; भांडुपमध्ये तृतीय स्तरावरील प्रक्रिया केंद्राला मंजुरी, १ हजार ८२४ कोटींचा प्रकल्प