FIFA World Cup 2026 : बोस्निया अनपेक्षितपणे बाद फेरीत (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : बोस्निया अनपेक्षितपणे बाद फेरीत

बोस्निया आणि हर्झेगोव्हिना संघाने गुरुवारी ब-गटात कतारला ३-१ अशी धूळ चारून तिसऱ्या क्रमांकासह आगेकूच केली.

Swapnil S

सिएटल : बोस्निया आणि हर्झेगोव्हिना संघाने गुरुवारी ब-गटात कतारला ३-१ अशी धूळ चारून तिसऱ्या क्रमांकासह आगेकूच केली. प्रत्येक गटातील आघाडीच्या दोन संघांसह सर्व १२ गटांतील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम आठ संघांनाही बाद फेरी गाठण्याची संधी आहे. त्यानुसार बोस्नियाने पुढील फेरीत स्थान पक्के केले.

सामन्याच्या २९व्या मिनिटाला १८ वर्षीय केरिम अलाजबेगोव्हिकने गोल करत बोस्नियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. विश्वचषकाच्या इतिहासातील आठवा सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू म्हणून त्याने नाव नोंदवले. त्यानंतर ३४व्या मिनिटाला कतारच्या सुलतान अल-ब्रेकच्या चुकीमुळे बोस्नियाला स्वंयगोलच्या स्वरूपात दुसरी भेट मिळाली. कतारसाठी हसन अल हायडोसने ४२ व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी केली. सामन्याच्या ८०व्या मिनिटाला एरमिन माहमिकने गोल नोंदवत बोस्नियाचा विजय ३-१ असा निश्चित केला.

बोस्नियाचे प्रशिक्षक सर्जे बारबारेझ यांनी सांगितले की, ‘आम्ही इतिहास घडवण्यासाठी आलो होतो.

गोलफलक

  • बोस्निया (३) - कतार (१)

  • केरिम (२९ मि.) - हसन (४२)

  • महमूद (३४)

  • माहमिक (८०)

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! ऑगस्ट महिन्यात साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांची चिंता वाढली

सुटे तेलविक्री बंदीविरोधात व्यापारी आक्रमक; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

डिजिटल अरेस्ट : मुंबईत ED कडून दोघांना अटक