FIFA World Cup 2026 : हालँड-हॅरी द्वंद्वाची आज पर्वणी (Photo-X/@ani_digital)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : हालँड-हॅरी द्वंद्वाची आज पर्वणी

फिफा विश्वचषकात शनिवारी मध्यरात्री होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात चाहत्यांना नॉर्वेचा एर्लिंग हालँड विरुद्ध इंग्लंडचा हॅरी केन यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

Swapnil S

मियामी : फिफा विश्वचषकात शनिवारी मध्यरात्री होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात चाहत्यांना नॉर्वेचा एर्लिंग हालँड विरुद्ध इंग्लंडचा हॅरी केन यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मियामी स्टेडियम येथे नॉर्वे विरुद्ध हालँड यांच्यात लढत होणार आहे.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला. आता फ्रान्सच्या विजयासह मोरोक्कोचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुढील काही दिवसांत उपांत्य फेरीतील अन्य तीन संघ स्पष्ट होतील.

दरम्यान, सलग तिसऱ्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या इंग्लंडने राऊंड ऑफ ३२ लढतीत काँगोला नमवले, तर उपउपांत्यपूर्व लढतीत मेक्सिकोवर मात केली. १९६६च्या विजेत्या इंग्लंडला यंदा दुसऱ्या जेतेपदाची संधी आहे. गेल्या विश्वचषकात त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडचा कर्णधार केनने या विश्वचषकात ६ गोल नोंदवले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याशिवाय ज्यूड बेलिंघम, बुकायो साका, मार्कस रशफोड यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

दुसरीकडे नॉर्वेने १९९८ नंतर प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरल्यावर आता थेट उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यांनी प्रथमच अंतिम आठ संघांत स्थान मिळवले आहे. राऊंड ऑफ ३२ लढतीत नॉर्वेने आयव्हरी कोस्टला धूळ चारली, तर उपउपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडलासुद्धा नॉर्वे कडवी झुंज देईल, असे अपेक्षित आहे. नॉर्वेच्या हालँडने ७ गोल केले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच कर्णधार मार्टिन ओडेगार्ड, अँटोनियो नुसा, पॅट्रिक बर्ग यांच्यावर नॉर्वेची भिस्त आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २.३० वाजता ही लढत सुरू होईल.

नॉर्वे वि. इंग्लंड

  • स्थळ : मियामी स्टेडियम

  • वेळ : मध्यरात्री २.३० वाजल्यापासून (रविवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुधाची तहान ‘पिशवी’वर; सुट्या पिशवीतून दूधविक्रीला FDA ची बंदी, ...अन्यथा होणार ३ लाखांचा दंड

शिक्षक बदलीसाठी नियमावली तयार करणार; मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

राज्य सरकारचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज २८,३२५ कोटी रुपयांवर; राज्य वित्त लेखा परीक्षण अहवालात ठपका

Mumbai : जीर्ण इमारतीला स्वतंत्रपणे पुनर्विकासाचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

जनआरोग्य योजनेत गैरव्यवहार; SIT चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विविध आरोग्य योजनांचा आढावा