Instagram  
क्रीडा

Hardik-Natasa Divorce: हार्दिक-नताशा यांचा अखेर घटस्फोट; चार वर्षांनी संपवले नाते

गुरुवारी संध्याकाळी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहीत चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे.

Swapnil S

मुंबई : टी-२० विश्वचषकात दमदार कामगिरी करून लक्ष वेधणाऱ्या हार्दिक पंड्याचे खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. हार्दिकची पत्नी नताशाने मध्यंतरी आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहीत चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे.

हार्दिक व नताशाने चार वर्षांनी आपले नाते संपवले आहे. मुलासाठी मात्र पालक म्हणून आपण दोघे हवे ते करू, असेही हार्दिकने त्या पोस्टमध्ये म्हटले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस