ICC Women's T20 World Cup : भारतीय महिलांसमोर आज आफ्रिकेचा पेपर 
क्रीडा

ICC Women's T20 World Cup : भारतीय महिलांसमोर आज आफ्रिकेचा पेपर

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सुरुवात करणारा भारतीय संघ रविवारी महत्त्वाच्या सामन्यात धोकादायक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

Swapnil S

मँचेस्टर : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार सुरुवात करणारा भारतीय संघ रविवारी महत्त्वाच्या सामन्यात धोकादायक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवून केली होती. या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधना आणि यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष यांनी फलंदाजीत चमक दाखवली, तर दीप्ती शर्मा हिने ५ बळी घेत सामना जिंकवून देणारी कामगिरी केली होती.

भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यातही हीच लय कायम ठेवत नेदरलँड्सचा ९५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. टी-२० विश्वचषकात पाच वेळा उपांत्य गाठूनही भारताला अजून पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत महिला : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयांका पाटील, राधा यादव.

दक्षिण आफ्रिका महिला : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, नादीन डे क्लर्क, अॅनेरी डेर्कसेन, शबनिम इस्माईल, सिनालो जाफ्टा, मारिझाने कॅप, आयाबोंगा खाका, सुने लस, काराबो मेसो, नॉकुलुलेको मलाबा, कायला रेयनेके, टुमी सेखुखुने क्लो ट्रायोन, डेन वेंक नायकेर्क.

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके