संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

IND vs SA: अक्षर पटेल आजारी; उर्वरित सामन्यांसाठी 'या' खेळाडूला संधी, दोन वर्षांनंतर टीम इंडियात वर्णी

भारताचा डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल आजारामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित २ टी-२० सामन्यांना मुकणार आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेल आजारामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित २ टी-२० सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी शाहबाझ अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत-आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. प्रकृती बिघडल्याने अक्षर तिसऱ्या सामन्याला मुकला होता. बुधवारी उभय संघांत चौथा सामना होणार आहे. मात्र अक्षर या दोन्ही लढतीसाठी अनुपलब्ध असेल, असे बीसीसीआयने जाहीर केले. त्यामुळे ३१ वर्षीय शाहबाझला संधी लाभली आहे.

दोन वर्षांनंतर टीम इंडियात वर्णी

शाहबाझने भारतासाठी २ टी-२० व ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. शाहबाझ सध्या मुश्ताक अली स्पर्धेत बंगालकडून खेळत आहे. भारतासाठी तो २०२३मध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. आयपीएलमध्ये शाहबाझने बंगळुरू, हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

लखनौ येथे उभय संघांतील चौथा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे, त्यानंतर अहमदाबादला पाचवी लढत होईल.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय