Ind vs Pak Asian Games 2026 : भारतीय पुरुषांची सुवर्णपदकाला गवसणी; पाकिस्तानवर दणदणीत विजय X
क्रीडा

Ind vs Pak Asian Games 2026 : भारतीय पुरुषांची सुवर्णपदकाला गवसणी; पाकिस्तानवर दणदणीत विजय

अभिषेक शर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीनंतर तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने रविवारी अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

Swapnil S

निशिन : अभिषेक शर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीनंतर तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने रविवारी अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह भारताने आपणच क्रिकेटमध्ये किंग असल्याचे दाखवून देत २०२४ च्या टी-२० विश्वचषकापासून पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ६-० अशी कायम ठेवली.

सुरुवातीला फलंदाजीसाठी काहीशी कठीण असलेल्या खेळपट्टीवर जगातील नंबर वन टी-२० फलंदाज अभिषेक शर्माने अवघ्या २८ चेंडूंत ७ तुफानी षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तानकडून हसन नवाजने ५१ चेंडूंत ९६ धावांची तडाखेबंद खेळी करत भारतासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, जसप्रीत बुमराहचा अनुभव आणि वॉशिंगटन सुंदरच्या (२/२९) अचूक गोलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानला निर्धारित षटकांत ६ बाद १९२ धावांवर रोखले. वाशिंग्टन सुंदरने टाकलेले १८ वे षटक सामन्याचा निकाल ठरवणारे ठरले, ज्यामध्ये त्याने केवळ ८ धावा दिल्या.

या सुवर्णपदकामुळे कर्णधार श्रेयस अय्यरवरील काहीसा ताण हलका झाला आहे. भारताने पॉवरप्लेमध्ये ८१ धावांची धमाकेदार सुरुवात केली होती. इशान किशन (२०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२१) यांनी मधल्या फळीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु फिरकीपटू अराफात मिन्हासने (२/२५) दोघांना माघारी पाठवले. मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या धावांवर अंकुश ठेवला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट