(Photo-X)
क्रीडा

विजयी आघाडीसाठी भारतीय संघ सज्ज; विराटवर पुन्हा लक्ष, गुवाहाटीत आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना; पाहुण्यांना विजय अनिवार्य

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : फलंदाजी ही जमेची बाजू असली, तरी वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला गोलंदाजीत सुधारणा अपेक्षित आहे.

Swapnil S

गुवाहाटी : फलंदाजी ही जमेची बाजू असली, तरी वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला गोलंदाजीत सुधारणा अपेक्षित आहे. गुवाहाटी येथे उभय संघांतील दुसरी लढत रंगणार असून हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

थिरुवनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने २९६ धावांचे लक्ष्य ४२ षटकांपेक्षा कमी वेळेत पार केले. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी शानदार शतके झळकावली. डाव्या हाताचा मनगटी गोलंदाज कुलदीप यादवनेही प्रभावी मारा करत आपले महत्त्व सिद्ध केले. मात्र, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या अनुपस्थित असताना वेगवान गोलंदाजीची बाजू कमकुवत भासली. आगामी एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून मोहम्मद सिराजला विश्रांती देत नितीशकुमार रेड्डीला नवीन चेंडूने गोलंदाजीची संधी देण्यात आली होती. मात्र हा प्रयोग अपयशी ठरला.

डाव्या मांडिच्या दुखापतीतून सावरत असलेल्या रेड्डीला सुरुवातीला लय आणि अचूकता राखण्यात अपयश आले. याचा फायदा घेत ३२ वर्षीय वेस्ट इंडिजचा सलामीवीर जस्टिन ग्रीव्ह्सने १०८ चेंडूत १०१ धावांची नाबाद शतकी खेळी करत संघाला २९५ धावांपर्यंत पोहोचवले. कर्णधार गिलने तातडीने रेड्डीला गोलंदाजीतून बाजूला केले. हार्दिक अद्याप तंदुरुस्त झालेला नाही आणि बुमरा आशियाई क्रीडा स्पर्धेत व्यस्त असल्याने, विश्वचषकापूर्वी पर्यायांची चाचपणी करण्यासाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.

फलंदाजीत विराट कोहली पुन्हा एकदा लयीत दिसल्याने भारताची चिंता मिटली आहे. कोहलीने सचिन तेंडुलकरनंतर १५ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय होण्याचा मान मिळवला. जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केलेल्या बारस्परा स्टेडियमवर कोहली पुन्हा परतला आहे.

ग्रीव्ह्स दुखापतीमुळे मुकणार

वेस्ट इंडिजसाठी ही मालिका जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे बंधनकारक आहे. कर्णधार शाय होप आणि प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांच्या मार्गदर्शनाखाली विंडीज संघ मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल. २००२ नंतर विंडीजला भारतावर एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. तसेच आगामी विश्वचषक पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठी विंडीज संघाला संघर्ष करावा लागत आहे. सलामीवीर ग्रीव्ह्स स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीस मुकणार आहे. त्यामुळे विंडीजपुढील चिंता वाढली आहे.

वेळ : दुपारी २ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि जिओहॉटस्टार ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका

Mumbai : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार; देशभरातील सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Jalgaon : शेतातील पांढरे सोने काळवंडणार; कापूस उत्पादन ५० ते ६० टक्के घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज