IPL 2026 : सलग तिसऱ्या विजयासाठी गुजरात सज्ज; गोलंदाजी सुधारण्याचे पंजाब किंग्स संघासमोर आव्हान (Photo-@ranjitrophy)
क्रीडा

IPL 2026 : सलग तिसऱ्या विजयासाठी गुजरात सज्ज; गोलंदाजी सुधारण्याचे पंजाब किंग्स संघासमोर आव्हान

मागील सामन्यात पराभव पत्करावा लागलेला 'पंजाब किंग्स'चा संघ रविवारी आयपीएलमधील सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

Swapnil S

अहमदाबाद : मागील सामन्यात पराभव पत्करावा लागलेला 'पंजाब किंग्स'चा संघ रविवारी आयपीएलमधील सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा संघ सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

पंजाब किंग्सने आठ सामन्यांतून १३ गुणांसह गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ एका गुणाने मागे आहेत.

स्पर्धेच्या सुरुवातीला सलग सहा सामने जिंकणाऱ्या पंजाब संघाच्या गोलंदाजीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. पंजाबच्या मजबूत फलंदाजीमुळे गोलंदाजीतील त्रुटी काही प्रमाणात झाकल्या गेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघांना धावा करण्याची मोकळीक दिल्याने पंजाबच्या फलंदाजांवर दडपण आले आहे. याशिवाय खराब क्षेत्ररक्षणासह अनेक डोल सोडल्याचा फटका त्यांना बसला आहे. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे, तर कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील मधली फळी मजबूत आहे. कूपर कॉनली यानेही फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे.

गुजरात टायटन्सचा संघ सध्या १० गुणांसह पाचव्या स्थानावर असून, त्यांचा प्रवास आतापर्यंत चढउतारांचा राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर संघात चांगली लय दिसून येत आहे. गुजरातच्या फलंदाजीची भिस्त साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्यावर अधिक आहे. वॉशिंग्टन सुंदरने मधल्या फळीत चमक दाखवली आहे, तर शाहरूख खान आणि राहुल तेवतिया यांच्यासमोर सातत्य राखण्याचे आकान असेल. जेसन होल्डरने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलु कार्मागरी करत चार षटकांत २९ धावांत दोन बळी घेत तीन झेलही टिपले, गुजरातच्या गोलंदाजांनी मागील सामन्यात शिस्तबद्ध मारा करत आरसीबीला ५५५ धावांत गुंडाळले आहे.

खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही संतुलित आहे. येथील खेळपट्टीवर साधारणपणे चेंडूला चांगली उसळी मिळतो, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. खेळपट्टीच्या टणकपणामुळे वेगवान गोलंदाज नवीन चेंडूचा वापर करून काही प्रमाणात हालचाल मिळवू शकतात आणि उसळीचा फायदा घेऊ शकतात. जसजसा सामना पुढे सरकतो, तसतसे फिरकी मोलदाजाना खेळपट्टीवर थोडी ग्रिप आणि वळण मिळू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुसैन.

पंजाब किंग्ज: श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

Thane : व्यावसायिक सिलिंडर दरवाढीमुळे उद्योग संकटात; खानावळी, छोटे स्टॉलधारक, पोळीभाजी केंद्रांचे गणित बिघडले

Pune : नसरापूर ४ वर्षीय चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे कोण? पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के