टी-२० मुंबई महिला लीग लिलाव : इरा जाधव महागडी खेळाडू 
क्रीडा

टी-२० मुंबई महिला लीग लिलाव : इरा जाधव महागडी खेळाडू

अवघ्या १६ वर्षांच्या इरा जाधवने पहिल्यावहिल्या 'टी-२० मुंबई महिला लीग'च्या लिलावात १० लाख रुपये किमतीसह सर्वात महागडी खेळाडू होण्याचा मान मिळवला.

Swapnil S

मुंबई : अवघ्या १६ वर्षांच्या इरा जाधवने पहिल्यावहिल्या 'टी-२० मुंबई महिला लीग'च्या लिलावात १० लाख रुपये किमतीसह सर्वात महागडी खेळाडू होण्याचा मान मिळवला. आकाश टायगर्स संघाने इरावर ही बोली लावली आहे. यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

या लिलावात ३६३ खेळाडूंचा समावेश होता. ५० खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांनी एकूण १.४७ कोटी रुपये खर्च केले. इरा हिने गेल्या वर्षी १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान पटकावला होता. याआधी एमसीएने आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर केली होती. यात 'सोबो मुंबई फाल्कन्स'साठी सायली सातघरे, 'ठाणे स्काय रायझर्स' साठी सायमा ठाकूर आणि 'आकाश टायगर्स' साठी हुमैरा काझी यांचा समावेश होता.

'आकाश टायगर्स'ने भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाची उपकर्णधार सानिका चाळके हिला ५.५० लाख रुपयांना खरेदी केले. 'ठाणे स्काय रायझर्स'ने वृषाली भगतला ६ लाख रुपये, खुशी भाटियाला ४.५० लाख रुपये आणि झील डिमेलोला ४.५० लाख रुपये देऊन संघात सामील केले. 'सोबो मुंबई फाल्कन्स'ने सिमरन शेखसाठी ७लाख रुपये, हर्ले गालासाठी ५ लाख रुपये आणि रिया चौधरीसाठी ५.५० लाख रुपयांची बोली लावली. 'आकाश टायगर्स' ने फातिमा जाफर (४.२५ लाख रुपये), मिताली म्हात्रे (२.७५ लाख रुपये) आणि जीया मांडवाडकर (१.५० लाख रुपये) यांना संघात समाविष्ट केले.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन