रूट नाबाद ९९; इंग्लंडची मालिकेत बरोबरी X
क्रीडा

रूट नाबाद ९९; इंग्लंडची मालिकेत बरोबरी

जो रूटने १३३ चेंडूंत नाबाद ९९ धावांची संयमी खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर चार गडी व ३५ चेंडू राखून विजय मिळवून दिला. याबरोबरच इंग्लंडने ३ लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रविवारी तिसरा सामना खेळवण्यात येईल.

Swapnil S

कार्डिफ : जो रूटने १३३ चेंडूंत नाबाद ९९ धावांची संयमी खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर चार गडी व ३५ चेंडू राखून विजय मिळवून दिला. याबरोबरच इंग्लंडने ३ लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. रविवारी तिसरा सामना खेळवण्यात येईल.

या लढतीत भारताच्या फलंदाजीतील कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाला असून, अनुभवी खेळाडू रोहित शर्मा याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय भविष्याबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले आहेत. रोहितने ४७ चेंडूंत केवळ २६ धावा केल्या, ज्यामुळे त्याच्यावरील दबाव अधिक वाढला आहे. भारतीय संघ ४४ षटकांत अवघ्या २३३ धावांवर सर्वबाद झाला. विराट कोहली (६५) आणि श्रेयस अय्यर (६६) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय गोलंदाजांना लढण्यासाठी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

२३४ धावांचा पाठलाग करताना रूटने खेळपट्टीवरील अतिरिक्त उसळीचा सामना करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. त्याने विल जॅक्स (३०) याच्यासोबत सहाव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. इंग्लंडची एकवेळ ५ बाद १२५ अशी स्थिती झाली होती, परंतु रूटने सामना ४४.१ षटकांत संपवला. गस याने विजयी चौकार मारल्यामुळे रूटचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र त्याने संघाला विजयी केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशोत्सवासाठी BMC सज्ज; महापौर, उपमहापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

Ulhasnagar : बाप्पा येणार... पण खड्ड्यांतूनच? महापौरांचा संकल्प गेला खड्ड्यात! अजूनही विघ्न कायम; नागरिकांचा संतप्त सवाल

Pune : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; वाजत-गाजत निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आगमन मिरवणूक

बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

Thane : गणरायाच्या सुरक्षेसाठी मंडळे सज्ज! मोठ्या मूर्तीना पट्ट्यांचा आधार; खड्डेयुक्त रस्त्यांची खरी अडचण