कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय युवती संघाची आज दक्षिण कोरियाविरुद्ध उपांत्य लढत X
क्रीडा

कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय युवती संघाची आज दक्षिण कोरियाविरुद्ध उपांत्य लढत

भारतीय युवतींच्या संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानचा तब्बल १९-० असा फडशा पाडला. पूजा मलिकने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर भारताने थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा हा या स्पर्धेतील आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला.

Swapnil S

मोकी (चीन) : भारतीय युवतींच्या संघाने कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानचा तब्बल १९-० असा फडशा पाडला. पूजा मलिकने नोंदवलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर भारताने थाटात उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा हा या स्पर्धेतील आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. आता आज म्हणजेच शनिवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची दक्षिण कोरियाशी गाठ पडेल.

चीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात भारताने तब्बल १८ पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि एक पेनल्टी स्ट्रोकही प्राप्त केला. याउलट पाकिस्तान संघाला एकही गोल करता आला नाही, तसेच त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर किंवा पेनल्टी स्ट्रोक मिळवता आला नाही. भारताने पहिल्या मिनिटापासूनच सामन्यावर पकड मिळवत पहिल्या सत्रात ५, दुसऱ्या सत्रात ५, तिसऱ्या सत्रात ३ आणि अंतिम सत्रात ६ गोल झळकावले.

सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांत भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. सहाव्या मिनिटाला भारताने मारलेला गोल रेफरलमुळे रद्द झाला. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पूजा साहू हिने गोल करत भारताचे खाते उघडले. नवव्या मिनिटाला रोशनी ऐंद हिने मैदानी गोल करून आघाडी २-० केली, तर ११व्या मिनिटाला तनुश्री कडू हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेर ६०व्या मिनिटाला रोशनी हिने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, दुसरी उपांत्य लढत चीन आणि जपान यांच्यात होईल.

  • वेळ : सकाळी ९.४५ वाजता

  • थेट प्रक्षेपण : आशियाई हॉकी महासंघाची यूट्यूब वाहिनी

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा