एक्स @ManuBhakar
क्रीडा

खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकरला डावलले?

भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीतून डावलण्यात आल्याचे समजते.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीतून डावलण्यात आल्याचे समजते. त्यामुळे तिचे वडील राम किशन यांनी क्रीडा मंत्रालय व शासनावर कडाडून टीका केली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनूने खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज न केल्याचे समजते. तूर्तास कोणत्या खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे, याची पूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मनूने अर्ज भरला नसला, तरी तिचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

त्याशिवाय क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कारासाठी ३० जणांची निवड केली असल्याचे समजते. यामध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळे व पॅरालिम्पिकपटू सचिन खिल्लारी यांचाही समावेश आहे. लवकरच अंतिम यादी जाहीर होईल.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन