लिओनेल मेस्सीचे शानदार ४ गोल; इंटर मियामीची मॉन्ट्रियलवर ७-१ ने मात (Photo-X)
क्रीडा

लिओनेल मेस्सीचे शानदार ४ गोल; इंटर मियामीची मॉन्ट्रियलवर ७-१ ने मात

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने उत्तरार्धात तीन गोल लगावत ‘मेजर लीग सॉकर’मधील (एमएलएस) आपली पहिली चार गोल करण्याची कामगिरी नोंदवली.

Swapnil S

मियामी : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने उत्तरार्धात तीन गोल लगावत ‘मेजर लीग सॉकर’मधील (एमएलएस) आपली पहिली चार गोल करण्याची कामगिरी नोंदवली. मेस्सीच्या या चार गोल आणि एका असिस्टच्या जोरावर इंटर मियामीने सीएफ मॉन्ट्रियलचा ७-१ असा दणदणीत पराभव केला.

सामन्याच्या २० व्या मिनिटाला टेलॅस्को सेगोव्हियाच्या कॉर्नर किकवर कार्लोस कॅसिमिरोने हेडरद्वारे गोल नोंदवून इंटर मियामीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३४ वर्षीय मध्यरक्षक कॅसिमिरोचा ६व्या लीग सामन्यातील हा पहिला गोल ठरला, तर दुसऱ्या एमएलएस हंगामात सेगोव्हियाचे हे कारकीर्दीतील नववे असिस्ट ठरले. त्यानंतर ३७ व्या मिनिटाला फेबियन हर्बर्सने गोल करत मॉन्ट्रियलला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

सामन्याच्या ४० व्या मिनिटाला मेस्सीने फ्री-किकवर मोसमातील १५ वा गोल करत १-१ ची बरोबरी तोडली आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. ५२ व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा गोल नोंदवून मियामीची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. मेस्सीने मोसमातील आपले १७ वे आणि १८ वे गोल अनुक्रमे ८३ व्या मिनिटाला आणि स्टॉपेज टाइमच्या सहाव्या मिनिटाला डागले, ज्यातील शेवटचा गोल पुन्हा एकदा फ्री किकवर आला.

लुईस सुआरेझने ८० व्या मिनिटाला मेस्सीच्या १० व्या असिस्टवर मोसमातील ११ वा गोल नोंदवून मियामीला ४-१ असे पुढे नेले. त्यानंतर १८ वर्षीय नवोदित अलेक्झांडर शॉने ८९ व्या मिनिटाला मियामीसाठी ६-१ अशी आघाडी मिळवून दिली. शॉचा तीन सामन्यांतील सहभाग आणि ३७ मिनिटांच्या खेळात हा पहिला गोल ठरला.

इंटर मियामीसाठी (१२-४-६) गोलरक्षक डेन सेंट क्लेअरने तीन बचाव केले. मॉन्ट्रियलविरुद्ध सलग पाचव्या विजयानंतर मियामीने ऑगस्ट महिन्याची सांगता १-२-२ अशा कामगिरीसह केली. दुसरीकडे, मॉन्ट्रियलच्या (५-११-६) थॉमस गिलियरने पाच गोल रोखले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान; राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

Mumbai : डीआरआयची आंतरराष्ट्रीय सोने तस्करांच्या टोळीवर मोठी कारवाई; १०.७५ कोटींचे सोने जप्त, सहा जणांना अटक

गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी

समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार

भारतीय मानक वेळ अनिवार्य करणारे नियम सरकारकडून जारी; अंमलबजावणीसाठी १८० दिवसांची मुदत