क्रीडा

"अरे माझा डुप्लीकेट..." आपल्या सारख्याच दिसणाऱ्या लहानग्याला पाहून रोहित शर्माला काय म्हणाला किंग कोहली?

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली मैदानात सराव करत होता. नेहमीप्रमाणे विराटची एक झलक बघण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. सराव थांबवून आतूरतेने वाट बघणाऱ्या चाहत्यांशी संवाद साधायला विराट गेला. पण यावेळी चाहत्यांच्या गर्दीतील एका लहानग्याला पाहून तो क्षणभर थबकला...

Mayuri Gawade

बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर शानदार विजय नोंदवून नववर्षाची उत्तम सुरुवात केली. विराट कोहली (९१ चेंडूंत ९३ धावा) आणि शुभमन गिल (७१ चेंडूंत ५६ धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला ४ गडी व ६ चेंडू राखून धूळ चारली. पण, भारताच्या विजयाशिवाय या सामन्यातील एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालतेय.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली मैदानात सराव करत होता. नेहमीप्रमाणे विराटची एक झलक बघण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. सराव थांबवून आतूरतेने वाट बघणाऱ्या चाहत्यांशी संवाद साधायला विराट गेला. पण यावेळी चाहत्यांच्या गर्दीतील एका लहानग्याला पाहून तो क्षणभर थबकला. त्यामागे कारणही तसंच होतं. कारण या चिमुकल्याला बघून जणू लहानपणीचा विराट कोहलीच असल्याचा भास होत होता. हा चिमुकला म्हणजे गर्वित उत्तम. गर्वितच्या चेहऱ्याची ठेवण, डोळे, केसांची स्टाईल आणि हावभाव पाहता अनेकांना क्षणभर वाटलं की समोर उभा असलेला मुलगा म्हणजे लहानपणीचा विराट कोहलीच. त्यानंतर विराटने या मुलासोबत संवाद साधला, फोटो काढले आणि त्याच्यासोबत आपले ट्रेडमार्क फिस्ट-पंपही (खास मुठी आवळण्याची कृती) केले.

'तिकडे बघ, माझा डुप्लिकेट!'

या भेटीनंतर गर्वितने एका मुलाखतीत विराटच्या भेटी प्रसंगीचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मी एकदा विराटचं नाव घेतलं, त्याने माझ्याकडे पाहिलं आणि 'हाय' बोलून मी थोड्यावेळात येतो असं सांगितलं. त्यानंतर विराट कोहली रोहित शर्माला म्हणाला, ‘ओये...तिकडे बघ, माझा डुप्लिकेट बसलाय...' मला 'छोटा चिकू' म्हणत होता" ('मैंने एक बार उनका नाम लिया और फिर उन्होंने मेरी ओर देखा और हाय बोलकर कहा कि मैं थोड़ी देर में आता हूं. विराट कोहली तभी वहां मौजूद रोहित शर्मा से कहा कि वहां पर देख- मेरा डुप्लीकेट बैठा है.' इसके बाद इस नन्हे फैन ने यह भी बताया कि कोहली ने उन्हें छोटा चीकू' भी बोला था.) असे गर्वितने सांगितले.

या भेटीनंतर इंटरनेटवर गर्वित आणि विराटच्या बालपणीच्या फोटोंची तुलना करणारे पोस्ट, रील्स आणि मीम्स मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. सोशल मीडियावर 'विराटचा मिनी व्हर्जन' चर्चेचा विषय ठरतोय.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग