यशस्वीचा यष्टिरक्षणाचा सराव; सूर्यकुमारकडे मात्र कानाडोळा? मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश आगामी हंगामासाठी उत्सुक (Photo-X)
क्रीडा

यशस्वीचा यष्टिरक्षणाचा सराव; सूर्यकुमारकडे मात्र कानाडोळा? मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश आगामी हंगामासाठी उत्सुक

Ranji Trophy 2026 : रणजी करंडकाच्या आगामी हंगामातील पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयाचा आपण आदर करतो, असे मुंबईचा नवनियुक्त कर्णधार सिद्धेश लाड याने गुरुवारी स्पष्ट केले.

Swapnil S

मुंबई : रणजी करंडकाच्या आगामी हंगामातील पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयाचा आपण आदर करतो, असे मुंबईचा नवनियुक्त कर्णधार सिद्धेश लाड याने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, हंगामासाठी योग्य तयारी करणारे खेळाडू निवडीच्या चर्चेत निश्चितच असतील, असेही त्याने सांगितले.

३६ वर्षीय सूर्यकुमारने रणजी हंगामाच्या तयारीसाठी मुंबई संघाच्या सरावाला हजेरी लावली नव्हती. निवड होण्याच्या सुमारे १० दिवस आधी निवड समितीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर निवड बैठकीच्या काही काळ आधी त्याने रणजीसाठी उपलब्ध असल्याचे कळवले. मात्र, लाल चेंडूच्या क्रिकेटचा पुरेसा सराव नसल्याचे कारण देत राजेश पवार यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याची निवड केली नाही.

“सूर्या मुंबई क्रिकेटसाठी शानदार खेळाडू राहिला आहे. त्याने मुंबई क्रिकेटसाठी तसेच भारतीय संघासाठीही मोठे योगदान दिले आहे. तो विश्वचषक विजेता कर्णधार आहे. त्यामुळे आमच्या संघात त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे,” असे सिद्धेशने सांगितले.

“मात्र, व्यवस्थापन आणि निवड समिती सध्या जो निर्णय योग्य समजत आहे, त्याचा कर्णधार म्हणून मी आदर करतो. हंगामासाठी जो खेळाडू चांगली तयारी करत आहे आणि निवडीच्या शर्यतीत आहे, तो चर्चेत असेलच. मात्र, मला निवड समितीच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. माझे काम माझ्याकडे असलेल्या १५ खेळाडूंसोबत सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आहे,” असे सिद्धेशने स्पष्ट केले. रणजी हंगामासाठी सिद्धेशकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून १९ वर्षीय आयुष म्हात्रेला उपकर्णधार करण्यात आले आहे.

तसेच भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आता यष्टिरक्षणातही हात आजमावत असल्याची माहिती सिद्धेशने पत्रकार परिषदेत दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ; 'झेड प्लस' सुरक्षा अजून मजबूत

Mumbai : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल उद्यापासून सेवेत; ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात

Mumbai : भगत ताराचंदसह चौघांचे परवाने रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Mumbai : वरळीची हवा सर्वात खराब; एक्यूआय १६४ वर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी