क्रीडा

नरेन प्रणवचा कांस्यवेध; ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

भारताचा किशोरवयीन नरेन प्रणवने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पुरुष १० मीटर एअर रायफल प्रकारात शनिवारी कांस्यपदकाला गवसणी घातली. नरेनच्या या यशामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या पाचवर गेली आहे.

Swapnil S

सुहल (जर्मनी) : भारताचा किशोरवयीन नरेन प्रणवने आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पुरुष १० मीटर एअर रायफल प्रकारात शनिवारी कांस्यपदकाला गवसणी घातली. नरेनच्या या यशामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या पाचवर गेली आहे.

नरेनने एकूण २२७.९ गुणांची कमाई केली. चीनच्या हुआंग लिवनलीनने २५०.३ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. यूएसएच्या ब्रॅडेन पेईसरने २५०.० गुण मिळवून रौप्यपदक जिंकले. प्रणवसाठी अंतिम फेरी सोप्पी नव्हती. पदकांच्या रेसमध्ये पेईसर, हुआंग, अफ्रीरे हे दिग्गज खेळाडू होते. नरेनने दबावाला बळी न पडता मजबूत सुरुवात केली.

२४ शॉट्सच्या सामन्यात सुरुवातीच्या फॉर्मनेच त्याला पदक मिळवून दिले. पहिल्या ५ शॉट्सनंतर नरेन आघाडीवर होता. २२ शॉट्सनंतर नरेन पेईसरपेक्षा १.१ आणि हुआंगपेक्षा १.२ गुणांनी मागे होता. तेथेच तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. याआधी, प्रणवने ७७ स्पर्धकांच्या पात्रता फेरीत ६३२.१ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला होता.

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे; नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना

­सत्तेत एकत्र, पण कारभारावरून संघर्ष! पाणीपुरवठा प्रकरणावरून सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप-शिंदे सेना आमनेसामने