क्रीडा

ICC T20 World Cup 2026 : निसांकाचा शतकी डंका; ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, सलग तिसऱ्या विजयासह श्रीलंकेचा सुपर-आठ फेरीत प्रवेश

पथुम निसांकाने सोमवारी यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिले शतक साकारताना ५२ चेंडूंत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्यामुळे श्रीलंकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व १२ चेंडू राखून फडशा पाडला.

Swapnil S

पाल्लेकेले : पथुम निसांकाने सोमवारी यंदाच्या टी-२० विश्वचषकातील पहिले शतक साकारताना ५२ चेंडूंत नाबाद १०० धावा फटकावल्या. त्यामुळे श्रीलंकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ८ गडी व १२ चेंडू राखून फडशा पाडला. सलग तिसऱ्या विजयासह श्रीलंकेने थाटात सुपर-आठ फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलिया मात्र साखळी फेरीतच गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

पाल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या ब-गटातील या लढतीत ऑस्ट्रेलियाला २० षटकांत १८१ धावांत गुंडाळल्यावर श्रीलंकेने १८ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. निसांकाने १० चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. श्रीलंकेसाठी हे विश्वचषकातील एकंदर दुसरे शतक ठरले. २०१०मध्ये महेला जयवर्धनेने त्यांच्यासाठी पहिले शतक साकारले होते. कुशल मेंडिस (३८ चेंडूंत ५१) व पवन रत्ननायके (१५ चेंडूंत नाबाद २८) यांनी निसांकाला उपयुक्त साथ दिली.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्श (२७ चेंडूंत ५४) व ट्रेव्हिस हेड (२९ चेंडूंत ५६) या सलामीवीरांनी आक्रमक अर्धशतके झळकावताना ५१ चेंडूंतच १०४ धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र फिरकीपटू हेमंताने हेड व मार्शला बाद केले व ऑस्ट्रेलियाचा डाव घसरला. परिणामी त्यांचा संघ १८१ धावांत गारद झाला. त्यानंतर मात्र निसांकाने कांगारूंची यथेच्छ धुलाई केली व संघाला आगेकूच करून दिली. आता मंगळवारी झिम्बाब्बे-आयर्लंड लढत निर्णायक ठरेल.

व्याजदर यंदाही स्थिरच; एल निनो, युद्धामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला महागाईची धास्ती

'ते' पत्र अखेर वाहन संघटनेकडून मागे; E20 इंधनाबाबतची आकडेवारीत स्पष्टता हवी!

माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला काळे फासू; राष्ट्रवादीचा काँग्रेसला गंभीर इशारा

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?