क्रीडा

पंतप्रधान मोदींनी केलं शमीचं सांत्वन; गळाभेट घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

सामन्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय खेळाडुंची विचारपूस केली होती.

नवशक्ती Web Desk

यंदाच्या विश्वचषकात भारतीय चाहत्यांची निराशा झाली असली तरी क्रिकेट प्रेमींकडून आपल्या खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. तुम्ही आम्हाला खूप आनंद दिला. सलग १० सामने जिंकून एका वेगळ्या झोनमध्ये तुम्ही आमचं मनोरंजन केलं ते काही कमी नाही. तो दिवस तुमचा नव्हता, असं देखील चाहत्यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलिया संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय संघाच्या मात्र डोळ्यात पाणी तरळल. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय खेळाडुंची विचारपूस केली होती. हा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या व्हिडिओत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची गळा भेट घेऊन सांत्वन करताना दिसत आहेत. शमीनं आपल्या इंस्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट