ग्रँड चेस टूर अंतिम फेरी : प्रज्ञानंदचा अंतिम फेरीत प्रवेश (Photo-X)
क्रीडा

ग्रँड चेस टूर अंतिम फेरी : प्रज्ञानंदचा अंतिम फेरीत प्रवेश

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ग्रँड चेस टूरच्या अंतिम टप्प्यातील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Swapnil S

सेंट लुईस : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ग्रँड चेस टूरच्या अंतिम टप्प्यातील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रज्ञानंदने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा १९-९ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आता विजेतेपदासाठी प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाशी होणार आहे.

दुसरा क्लासिकल सामना जिंकल्यानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने अंतिम दिवसाच्या खेळाआधीच ६ गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. अंतिम दिवशी झालेल्या रॅपिड प्रकारातील सलग दोन सामन्यांत प्रज्ञानंदने कीमरवर मात करत १७-३ अशी अजिंक्य आघाडी मिळवून आपले अंतिम फेरीतील स्थान जवळजवळ निश्चित केले होते. त्यानंतर ब्लिट्झ प्रकारातील पहिल्या सामन्यात विजय मिळवत त्याने आपल्या गुणांची संख्या १९ वर पोहोचवली. नियमानुसार सर्व सामने खेळणे बंधनकारक असल्याने कीमरने ब्लिट्झ प्रकारातील शेवटचे तीन सामने जिंकले, मात्र तोपर्यंत विजयाची संधी त्याच्या हातातून निघून गेली होती.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने अप्रतिम खेळ करत वेस्ली सो याला १८-९ असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. ‘ग्रँड चेस टूर’च्या अंतिम टप्प्यातील ही स्पर्धा ४ लाख ५० हजार अमेरिकन डॉलरची आहे. यात विजेत्याला २ लाख डॉलर, तर उपविजेत्याला १ लाख २५ हजार डॉलरचे पारितोषिक मिळणार आहे. कारुआनाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी प्रज्ञानंद त्याला तगडे आव्हान देण्यास सक्षम आहे.

तीसऱ्या स्थानाच्या लढतीसाठी आता कीमरचा सामना अमेरिकेच्या वेस्ली सोशी होईल. या स्पर्धेत अव्वल तीन स्थानांवर राहणाऱ्या खेळाडूंना पुढील वर्षाच्या ग्रँड चेस टूरसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.

तत्पूर्वी, सोमवारी प्रज्ञानंदने जर्मनीच्या विन्सेंट कीमरचा पराभव करत स्पर्धेत ९-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना सुरुवातीला प्रज्ञानंद अडचणीत सापडला होता आणि कीमरने त्याच्या राजावर आक्रमक चाल रचली होती. मात्र, कीमरच्या एका चुकीमुळे सामना फिरला. आता प्रज्ञानंदला जेतेपदाची संधी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुस्तमजी क्राऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हातोडा; सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

नारीशक्तीने रोखला शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग; प्रशासनाच्या निषेधार्थ खड्डेमय महामार्गावर साजरी केली मंगळागौर

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

कांदा एक्स्प्रेस आज दिल्लीत पोहचणार; ८०० टनाची पहिली खेप, ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांची माहिती

...तर MSME चा निधी पुरवठा ठप्प होईल; ‘एफआयएसएमई’ची भीती; RBI चा NBFC च्या कर्जावर नियंत्रणाचा विचार