सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंद तिसऱ्या फेरीत पराभूत (Photo-X)
क्रीडा

सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंद तिसऱ्या फेरीत पराभूत

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

Swapnil S

सेंट लुईस : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेतील युवा खेळाडूंमधील लढतीत प्रज्ञानंदने कडवी झुंज दिली, परंतु अखेर त्याला पराभव स्वीकारावा लागला.

गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या प्रज्ञानंदला गेल्या वर्षभरात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या केमरने पराभूत केले. या पराभवामुळे प्रज्ञानंद तीन फेऱ्यांनंतर १.५ गुणांवरच राहिला आहे. ४,७५,००० अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत आणखी सहा फेऱ्या शिल्लक असताना प्रज्ञानंद संयुक्तपणे चौथ्या स्थानावर घसरला आहे. दिवसातील सर्वात मोठा विजय फिलिपिन्सच्या वेस्टली सो याने मिळवला. सध्या अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेस्टली सो याने अमेरिकेच्याच कारुआनाला पराभूत केले. सलग दुसऱ्या विजया सह वेस्टली सो २.५ गुणांसह स्पर्धेत एकमेव आघाडीवर राहिला आहे. त्याच्यापाठोपाठ अर्मेनियातून अमेरिकेत आलेला लेव्हॉन अरोनियन आणि फ्रान्सचा मॅक्सिम वाशिये लाग्राव्ह हे खेळाडू आहेत. आता पुढील फेरीत भारतीय चात्यांना प्रज्ञानंदकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; 'भारत सोडा' नोटिसला आव्हान

Mumbai : एफडीएचा निर्णय बचत गटांसाठी ‘तिखट’च; सुट्या मसाला विक्रीवर बंदी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पाणीकपात; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द