सिंकफिल्ड बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंद अग्रस्थानी X
क्रीडा

सिंकफिल्ड बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंद अग्रस्थानी

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या आणि उपांत्य फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाशिए-लाग्रावचा पराभव केला. या विजयासह प्रज्ञानंदने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्यासह गुणतालिकेत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.

Swapnil S

सेंट लुईस : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या आणि उपांत्य फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाशिए-लाग्रावचा पराभव केला. या विजयासह प्रज्ञानंदने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्यासह गुणतालिकेत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. या विजयामुळे प्रज्ञानंदचे आठपैकी पाच गुण झाले असून, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ग्रँड फिनालेमधील त्याचे स्थान आता जवळपास पक्के झाले आहे.

पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या वाशिए-लाग्रावने प्रज्ञानंदविरुद्ध सर्व धोके पत्करत आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची ही रणनीती अंगलट आली. रुई लोपेझच्या म्युलर व्हॅरियेशन डावात फ्रान्सच्या खेळाडूने सुरुवातीलाच केलेले मोहर्याचे बलिदान केवळ वरवरचे प्रभावी ठरले. एका मोहऱ्याच्या बदल्यात प्रज्ञानंदचे तीन प्यादे गेले, तरीही त्याने आपल्या सैन्याची योग्य पुनर्रचना करत अवघ्या २८ चालींमध्ये विजय मिळवला.

दिवसातील इतर सामन्यांमध्ये वेस्ली सो याने सेव्हियन सॅम्युअल्सविरुद्ध डावाचा निकाल बरोबरीत सोडवला. उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हने सलग तिसरा विजय नोंदवताना हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा ५६ चालींमध्ये पराभव केला आणि ४.५ गुणांसह तिसरे स्थान गाठले. जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा ७६ चालींत पराभव करत ४.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

आता अंतिम आणि नवव्या फेरीत प्रज्ञानंद अनिश गिरीविरुद्ध खेळणार आहे. तर सिंदारोव्ह आणि वेस्ली सो यांच्यातही रंजक लढत पाहायला मिळेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडणार; सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांची माहिती

पुणे पुन्हा हादरले! जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; मुलीचा शोध घेण्याचा आरोपीने केला बनाव

BMC सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत घरांचा प्रश्न ऐरणीवर; उपलब्ध जमिनीचा विस्तृत तपशील सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

घरगुती PNG वापराला प्रोत्साहन; सरकार शहर वायू वितरण कंपन्यांना अतिरिक्त गॅस देणार

Mumbai : ६३८ आस्थापनांना न्यायालयात खेचले; मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष भोवले; शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापना रडारवर