बंगळुरू दुसऱ्या विजयासाठी उत्सुक; चेन्नईशी आज लढत 
क्रीडा

IPL 2026 : बंगळुरू दुसऱ्या विजयासाठी उत्सुक; चेन्नईशी आज लढत

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपला फॉर्म कायम राखण्यासाठी उत्सुक असून रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना सलग दुसऱ्या विजयाची आस आहे.

Swapnil S

बंगळुरू : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपला फॉर्म कायम राखण्यासाठी उत्सुक असून रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांना सलग दुसऱ्या विजयाची आस आहे.

टी-२० वर्ल्डकप विजयाचा शिल्पकार ठरलेला संजू सॅमसन अपयशी ठरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुरती गडगडली, त्याचबरोबर त्यांच्या गोलंदाजांनाही कामगिरी उंचावण्यात अपयश आले. त्याउलट २८ मार्च रोजी उद्घाटनाच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सहा विकेट्सनी विजय मिळवलेला बंगळुरूचा संघ अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर ताज्या दमाने मैदानात उतरणार आहे.

विराट कोहलीच्या (३८ चेंडूंत नाबाद ६९ धावा) फॉर्ममुळे बंगळुरूची फलंदाजी तगडी झाली असून देवदत्त पडिक्कल याने २६ चेंडूंत ६१ धावांची खेळी केल्यामुळे बंगळुरूच्या जेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत. कर्णधार रजत पाटीदार संघाचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळत असून मधल्या फळीत खंबीर आधार म्हणून साथ देत आहे. बंगळुरूच्या गोलंदाजीतही आमूलाग्र बदल घडून आला असून जेकब डफी, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा चांगले योगदान देत आहेत. शेरफाने रुदरफोर्ड आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत सनरायजर्स हैदराबादला २०० धावांवर रोखण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

चेन्नई सुपर किंग्जचे सलामीवीर सध्या झगडत असले तरी आयुष म्हात्रे, शिवम दुबे आणि सर्फराझ खान या मुंबईकर खेळाडूंनी त्यांच्या फलंदाजीची पडझड थांबवली आहे. सलामीच्या सामन्यात धावा काढण्यात अपयशी ठरल्यानंतर चेन्नईने पंजाब किंग्जविरुद्ध २०९ धावा उभारल्या. त्यात आयुष (७३), शिवम (नाबाद ४५) आणि सर्फराझ (३२) यांचे मोलाचे योगदान होते. इतके करूनही चेन्नईच्या गोलंदाजांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार न पाडल्यामुळे पंजाबविरुद्ध त्यांना पाच विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. नूर अहमद आणि राहुल चहर या त्यांच्या फिरकीपटूंना पंजाबच्या फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री, खलील अहमद आणि अंशूल कंबोज यांनाही पंजाबच्या फलंदाजांना रोखता आले नाही.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय